नात्यांचे रेशमी धागे.....
नको बर गूंता त्यात....
एकदा पडली गाठ....
तर रहाते ती खोलवर आत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमाच्या रेशमी धाग्यात....
गुंतल मन एकदा.....
अव्यक्त त्याच रहाण.....
सल होत खुपदा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विश्वासाचे रेशमी धागे.....
वेळीच जपावे बरं......
एकदा झाला गूंता तर.....
सुटत नाही कधी खरं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वप्नांचे रेशमी धागे.....
उगाच वीणत बसली ती वेडी.....
सारेच ते उसवणार.....
कुठे कळली तीला नियतीची खेळी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकनिष्ठेने जपावे......
धागे रेशमी नात्यांचे......
भरवश्याचा नको खेळ.........
घाव भरत नाही मनाचे......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गाठ नसलेला रेशमी धागा......
जातो बर सुईत.....
उसवलेल क्षणात वीणतो....
यात तुझ्यासारखाच तोही रे पटाईत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रयत्नांची गरज असते.....
गुंता नात्यातला सोडवण्यासाठी .....
प्रेम आणि प्रयत्नाने.....
जपुन घ्याव्या रे रेशीमगाठी ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रेशीमबंधात बांधशील का सख्या.....
धागा हा आपल्या मैत्रीचा ......
सुखी संसारासाठी आहे बर.....
तसा तो खूप खात्रीचा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रेशमी धाग्यांचा गुंताच जणू......
नात्यांचा हा खेळ .......
सोडवावा वाटे सगळ्यांना.....
पण नाही भेटायला वेळ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments