21 July 2022

आत्मविश्वास....चारोळी

तुला ती आवडते......
एवढेच तुझे म्हणणे होते.....
आत्मविश्वासाच्या परीभाषेत.....
आभाळ तीचू गाठणे होते.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मवीश्वासावर....
तीच्या जगेन बर ती....
तूमच्या डोळ्यात तीच्यासाठी...
विश्वास बघेन जेव्हा ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हो!!मी करू शकते.....
एवढच म्हणायच खरं.....
आपल्या पंखांच बळ....

आपणच बनायच बरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


तीच्या बाह्यरूपावर....
ताशेरे ते ओढले गेले....
असेही आत्मविश्वासाला....
तीच्या खुपदा मोडले गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु येशिल म्हणूनी....
उभी आजही त्या वळणावर....
आत्मविश्वास सांगतो....

 आताभेटशील तू सरणावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वासाचे बी....
अंकूरता मनात......
वाटत चमत्कारच घडतो....
आपल्याना जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयाशी आत्मविश्वासाचे....
नाही बर घेण देणे.....
अनुभवाच्या आधारावर...

होत त्याच येणे जाणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

'माझ्या नजरेतून बघ वेडू......
आहेस गं तु सुंदर किती"......
आवडते मला राजा तुझी.....
आत्मविश्वास वाढवण्याची ही निती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


स्त्रिला दिलेली.....
निसर्गानेच रे कला.....
बटना इतका सहज जोडते....

आत्मविश्वास तो गमवलेला.....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या हसण्यातूनही कळतो.....
आत्मविश्वास गं तूझा.....
सकारात्मक दृष्टीकोनाचा....
जणू तो आरसा  तूझा....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही...✍️✍️.

No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...