30 July 2022

विषय-- उंच माझा झोका -चारोळी संग्रह

उंच माझा झोक.......
आज गं खटकुन गेलां........
कितीदा बळीराजा माझा........
झोक्यावर लटकून गेला........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या सोबतीला सख्या.......
नाही कसली सरं......
उंच माझा कल्पनेचा झोका.....
जातो पार गगनावरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तूला हसतांना.....
पहायच आहे खुपदा......
होईन मी  झोका तुझा.....
यासाठी गं कित्येकदा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माप ओलांडता......
भातुकली दुरावली.....
उंच झोक्याची स्वप्न.....
स्वप्नच मग रे राहीली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाचा झुला झुलतांना.....
जाणले सख्या तूला जवळूनं.....
जपता तूला श्वासात....
नाही पहायचे आता वळूनझ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझा स्पर्श होता सख्या...
झुल्याविन झुलते बरं.....
मन हिंदोळ्यावर....
नाव तूझेच येते खरं ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घ्यावा उंच झोका.....
आसमंत चुंबणारा.....
मेघांच्या कुशित......
लिलया झेपावणारा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्या प्रेमाचा झोका...
उंच होता नभात......
पहाटे पाहीले.....
असे रे स्वप्नात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मागे नेला जितका झोका....
उंच तितकाच तो गेला......
किती सहज जगण्याचं....
गुपीत तो सांगुन ना गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या आठवांचा झूला.....
घेऊन गेला नभातं.......
नभातीत शशी का हसला......
का प्रश्न आजही मनातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उंच माझा झोका.......
वार्याची त्याला साथ.......
आभाळाला गवसणि घालण्याचं.....
आहे गं मनातं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...