31 July 2022

विषय-तुझं माझं जमेना....चारोळी संग्रह

तुझं  माझं जमेना.....
कसं म्हणु बरं.....
श्वासांशिवाय स्पंदनांच...
अस्तित्व असेल का खरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विरूध्द ध्रृवात आकर्षण....
आहे रे किती ना खरं....
तुझं माझं जमेना तरी....
ओढ किती असते  बरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना.....
तूझ्यावाचुन करमेना......
प्रेम जास्त कुणाचं.....
यावर ही वाद शमेना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्यासाठी तूझ्याशिच......
वेड्यागत ते भांडणं होतं.....
तुझं माझं जमेना मग.....
शेजार्यांच सांगणं होतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना....
आहे का रे हे खरं....
भेटता का रडतो.....
एवढ तरी मग सांग बरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छोट्या छोट्या गोष्टींवर.....
उगाच  रे रूसणं होतं.....
प्रेम आहे वेड्या तुझ्यावर....
हयातून हेच सांगणं होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्यावर रागवणं हा....
तुला आठवण्याचा बहाणा आहे....
तू आला की खुदकन हसतो....
तसा  राग माझा शहाणा आहे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......
नको व्हावं अस कधी......
असं झालं तर वेड्या.....
थांबेल माझ्या श्वासांची गती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......

अपरिहार्य रे मतभेद होणं.....

मनभेद न होऊ देता......

गरजेचे रे समजून घेणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या माझ्या नात्यातील.....
गंम्मत ही छानं....
तुझं माझं जमेना तरीही विसरतो.....
भेटता वेळ नि जगाचं भानं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना.....

कसं म्हणू बरं......

न बोलता तूझ्याशी.....

श्वास गुदमरतो खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना.....

कसं म्हणू बरं......

न बोलता तूझ्याशी.....

श्वास गुदमरतो खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हवं तेच हिरावून नेते.....
असं का गं करते बरं......
तुझं माझं जमेना नियती.....
हेच आहे कटुसत्य खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी चुकता कारे.......
नेहमी तु सावरतो......
तुझं माझं जमेना तरीही.......
का चुकांचा माझ्या पसारा तू आवरतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं आता.....
जमणार नाही गं खासं.....
पाठीमागे निंदा केल्याचा.....
मनि रूततो गं फासं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......

तरिही असं का रे घडते......

सोबत असता भांडणं.....

नि विरहात मन रडते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......

तरिही असं का रे घडते......

सोबत असता भांडणं.....

नि विरहात मन रडते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सासु सुन म्हणता.....
तुझं माझं जमेना.....
आपण दोघ जीव त्याचा....
हे वेळीच का गं उमजेना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकमेकात मन....
वेड  ते रमतं.....
तरीही तूझं माझं....
कुठे बर जमतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️

                       


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...