अमावस्येच्या त्या रात्री......
शशि म्हणे रे नभात नसतो....
तो रोहीणिला भेटायला.....
ढगांमध्ये का तो लपून बसतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या रात्री घडले.....
इतके ते छानं......
त्याच्या मनात मी असल्याची.....
दिली होती त्याने गं जाणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनाच्या शिंपल्यातं.
आजही ती रात्र रे बंद.....
दरवळे वेड्या त्यातं......
तुझ्या आठवांचा गंध.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या रात्री घडलं असं......
स्वप्न सारीच जळून गेली......
पतसंस्थेत गबन करुन......
सारी ती पळून गेली ......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
महागाई आणि बेरोजगारीने.....
तांडव असे घातलेले......
रोजगतं त्या रात्रीही.....
उपाशिच तेरे झोपलेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या रात्री म्हणे.......
असही घडलं होते.....
इर्भतीच्या नावावर....
आरूषी हत्याकांड रे रचल होते.....
.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या रात्री असं.....
छान ते घडलं होतं....
तो माझा झाल्याचं....
स्वप्न गं पडलं होतं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री??.....
हळुच तो पुसुन गेला......
संशयाचा त्याचा सुर......
खुप गं छळून गेला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री?......
सांगितले असते तुला......
पण न सांगण्याची गळ.....
घातलीय तीने मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री??......
उत्सुकता सगळ्यांना लागून होती.....
ती वेडी परीक्षा म्हणता.....
अभ्यास करत जागून होती....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री??.......
चर्चा गावात रंगली होती......
मतदान जवळ येता म्हणे......
मत कुणी विकली होती......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री??.....
कुणालाच नाही कळलं.....
माळीन गाव हरवून.....
अवशेषात उरलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री??....
नाही समजलं.....
वाईट स्वप्न होत वाटत...
उगाच मन दचकलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडल त्या रात्री??...
कळल कुठे अजून....
विषय का नाही आला...
प्रश्न आहेच पडून...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय घडलं त्या रात्री?.....
कोडे आजही तसचे होतं....
कोणी म्हणे भुत तर.....
कोणी म्हणे चोर होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
अप्रतिम
ReplyDelete