28 October 2021

ओंजळीतले सुख....चारोळी 28-10-2021

ओंजळीतलं  सुख.....
हळुच कानी सांगून गेल.....
जीवन हे क्षणभंगुर ग.... 
मन  का ग गुंतून गेलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्यक्तीसापेक्ष  सुख.....
ज्यात त्याच  ठरलेलं..... 
कोणाच्या ओंजळीतू सरलेल....
तर कुणाच देऊनही उरलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संस्कारांची फूले..... 
ओंजळीत भरलेली.... 
सुगंधीरूप  सूख ती....
कधी ती न सरली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाण्यासारख  सुखही....
निर्मळ  आणि  निराकार असतं ....
देत राहीलं  कि म ते....
चेहर्‍यावर  कुणाच्या गोड हसतं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                          शाही.... ✍️✍️
  

27 October 2021

सख्या रे..... चारोळी। 27-10-2021

मनातील  त्या  कप्यात....
शीरायची भीती वाटते ....
तूझ्या आठवांचे साम्राज्य ...
सख्या रे तीथे दाटते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भेट  नाही झाली की .....
रुसतो तु नियतीवर.....
जीव ओवाळून  टाकते....
तुझ्या या  भीतीवर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु लपवलेला मोगऱ्याचा  गजरा ....
गुपीत सारे  खोलून गेला..... 
अबोल प्रितीचा सांगावा असा.....
सुगंधात तो ठेउन गेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनामिक भीती ला....
दारावलच  थांबवले..... 
तुझ्या  माझ्या  भेटीचे  क्षण ....
असे  ना होते लांबवले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावनांना वाट  देतांना ....
अनामिक भीती रे वाटून जाते.... 
समजून  घेशील ना तु व्यक्त  होणं ....
कि गैरसमजांचे वादळ वाहून जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                     शाही.... ✍️✍️

अनामिक भीती.... चारोळी। 27-10-2021

अनामिक भीती ती .....
मुखवट्यात  लपलेली ....
कळी उमलण आधीच....
नको न ती कुस्करलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनामिक भीती ती .....
मनाचा खेळ  सारा.....
जवळ नाही  केली तरीही....
अंतर्मनात  असतो तिचा पसारा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कर नाही  त्याला....
डर ती कशाची.... 
नैतिकतेच्या वागण्याने ....
भीती दूर  पळायची...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
धैर्याशी जेव्हा  ही......
मी  गट्टी ग केलेली..... 
भीतीने  माझ्याशी.....
कट्टिच मग ग केलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही.... ✍️✍️


26 October 2021

चुक बरोबर... चारोळी। 25-10-2021

किती गोड  होतं ते ....
कट्टी सो च जगणं....
चुक बरोबर क्षणात विसरून ....
निरागस ते  वागणं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁सारेच  माझे  म....
चुक बरोबर कसे  करू.....
सल मनी ठेऊन ....
बेगडी  जगणं कसं ना धरू ... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁चुकेल मी खुपदा ....
तुला रे सावराव लागेल....
शिक्षा म्हणून कधी.... 
मिठीत ही धाव लागेल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चुक बरोबर  असे....
आता  काही उरत नाही ....
तुझ्या  शिवाय अस्तित्व ....
माझे रे मी धरत नाही...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                    शाही.... ✍️✍️ 

उदंड कष्ट... चारोळी। 25-10-2021

उदंड असतील हे कष्ट सारे...... 
मनात तरी अपयशाचे वारे..... 
सोबतीने तू असशील का रे ....
वादळे मनातील थोपवशील ना रे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उदंड असतील हे कष्ट सारे..... 
मनात तरी अपयशाचे वारे .....
आपलेच जेव्हा  विरोधक होतील ....
जिंकून  ही हरण्यात जमा सारे ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उदंड असतील हे कष्ट सारे ....
मनात तरी अपयशाचे वारे.... 
खुश  ठेवणे  सर्वांना ....
इतके कठीण का रे ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
मनातील  अपयशाचे वारे .....
नेहमीच  तीला  छळतात.....
जपण्यात साऱ्यांना ....
उदंड  कष्ट कमी का पडतात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही.... ✍️✍️

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...