08 January 2022

मनावरचे वळ... 8/1/2022

उपेक्षांनी  खुपदा......
एकटं तीला पाडली.....
मनावरच्या वळांना बळ करून.....
सिंधुताई माझी घडली .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षा  की प्रेम  तुझं....
कळत नाही  कंधी.....
ह्दयात ठेवशील की....
जपशील मना मंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षांनी त्या..
एकटे ते पाडले......
हक्क गृहीत धरण्याचे देऊन ....
का गं स्वतःला  जाळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  माझ्या नात्यांत.......
नाही द्यायची उपेक्षेला जागा.......
जगरहाटीच्या या खेळाला ही.......
गुंतवू बांधून  प्रेमाचा धागा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षा  देतो तु....
हरकत नाही  त्याची.....
खोट प्रेम  नको हो करू.....
शिक्षा, ही नाही सहन व्हायची......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षा  करते रे.....
नेहमी तूझ्या दोषांची......
जाणवता त्या सल मनाला.....
प्रेम माझं का आटल्याची.....
 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कारे करतो उपेक्षा.....
एकटी असे पाडुन.....
मनात आहे रे स्वप्न .....
किती रे देऊ गाळून......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाणतोना उपेक्षाच......
पदरी त्या पडलेल्या.....
तु समाजशील अपेक्षेत.....
वळ होऊन मनावर उठलेल्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्यांच्या अपेक्षांनी.....
उपेक्षित करून एकटे गं पाडले....
मनावर उठले वळ......
सल होऊन  नेहमी  छळले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुंपणच रे शेत खातं .....
वळ मनावर रहातील....
उपेक्षांशी कस लढु......
जिंकूनही नातीच रे हरतील......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आर्थिक  विवंचना  ही.....
उपेक्षित करून एकटं रे पाडते.....
मनावर उठतात वळ.....
नात्यातले एकटेपण असेही जाळते....
....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाचे वळ गं.....
बळ आता केलेले.....
उपेक्षांनी एकटे पाडून....
जगणे आता कळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री  म्हणून  उपेक्षांशी....
नात गं माझ जोडलेलं.....
मनावर वळ घेऊन  ही.....
लढणं कुठे मी सोडलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही.... ✍️✍️


उपेक्षा..... 8/1/2022

तु तर  पुरूष ......
रडता येत  नाही  म्हणे तुला.....
मनावरचे वळ सांगशील.....
कसे जपतो मला......

उपेक्षांनी तुलाही......
एकटे ना पाडलेले.....
पुरुष  तु कर्तव्य  तुझे.....
दुःख  हे न जाणलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी अपेक्षांना माझ्या ......
उपेक्षांच रे आलेली.......
मनावर उठले वळ......
भावना बोथट रे झालेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वय झाले  म्हणून का  ......
उपेक्षा  देऊन  एकटे पाडले......
मनावर वळ रे उठलेले......
चुक सांगशील लेकरा काय ते घडले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विधवा झाली म्हणून ही....
उपेक्षा तीची च व्हावी....
मनावरच वळ उठलेले.....
शिक्षा सांगा कुणा व्हावी....

विधवा  झाली  म्हणून .....
साजश्रृंगाराचा अधीकार नसावा का.....
हसण्यावरही दुनियादारी  ने.....
बंधन तीच्यावर ठेवावा का....

बाहेर पडतांना ही.....
नजरेचे ते पहारे.....
का उपेक्षा  तीची ही....
स्त्री हेच कारण का रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.... ✍️✍️


07 January 2022

चारोळी आणी हायकु... 7/1/2022

आठवतं ना रे किती संदर्भ लावले तु......
मँसेज च्या........ या माझ्या ....
खरा अर्थ  काय  आहे..... 
आजही ध्यानात  का रे तुझ्या .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


किती संदर्भ  लावावे.....
तुझ्या  त्या वळून रे पहाण्याचे.....
आवडते  तुला म्हणणे खरे का.....
अबोल या माझ्या वेड्या मनाचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेगळे  होते
संदर्भ  प्रत्येकाचे
अनुभवाचे

वेगळे होते
मनाचे ते कौल
हळूच बोल

वेगळे होते
प्रत्येकाचे म्हणणे
खरे असणे

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संदर्भ  किती वेगवेगळे ......
नियतीच्या खेळांचे......
खर काय गूढ उकलेना.....
जीवनातील मेळाव्यांचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संदर्भ  किती वेगवेगळे ......
नियतीच्या खेळांचे......
खर काय गूढ उकलेना.....
जीवनातील मेळाव्यांचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाचे संदर्भ .....
अनुभवातुन बदलत गेले ......
खऱ्या  खोट्याच्या दंव्दात.....
नाते हरवत गेले ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीची होते बडबड सुरू.......
संदर्भ  त्याला कुठे लागतो......
मनातील दंव्दाच खर कारण......
कळायला वेळ  कुठे तो ठाकतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विषयाला तुझ्या  बघ ना सखी.....
संदर्भ  किती वेगवेगळे दिले.....
ऋणानुबंध गोड गं तुझ्याशी....
म्हणणे खरे तुला ही  गं ना पटून गेले ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्रृंगार  करणे हक्क तीचा......
संदर्भ   वेगळेच काढले जातातं......
अनुभवातील चिंता खरीच असते ती......
पण हक्क तिचेच का गाळले जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही.... ✍️✍️


चारोळी संग्रह... 7/12/021

दुःखाचे  रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन  छळतात....
जुनीच ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःखाचे  रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन  छळतात....
जुनीच ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःखाचे  रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन  छळतात....
जुनीच ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख  ते दूःख.....
फसवे का लटके नाही  रे मज कळले....
गणीत त्यांचे मांडता....
आसवे आजही आपसुकच होते गळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षाभंगांचे फसवे दुःख ......
अपुर्णत्वाचाच शाप त्याला......
जुन्या  आसवांना  गळतांनाही.....
का नाही  याचा भास झाला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिच आणि  आसवांच.....
नातं ते जुनचं.....
सुख असो कि दूःख.....
ठरलेल त्यांच ओघळणंच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त  प्रेमाचं दुंख.....
किती ना ते फसवे.......
ओढ त्यालाही असेल भ्रमात......
गळतात आजही जुनीच आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रूप बदलून फसवण्याची दुःखा....
दुनियादारी  तुलाही जमते.....
जुन्या  आसवांना खेळी  तुझी....
कुठे रे ती कळते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुनीच आसवे माझी......
दुःखाचे रुप  ही ना रे फसवे.....
भेटता का गळली होती......
कळली का तुला तुझी रे ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही.... ✍️✍️


06 January 2022

मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

ऋणानुबंध  काय ते......
तुमच्या  मुळे कळले.....
चार ओळींच्या  चारोळीतुन....
नाते घट्ट जुळले......

           अल्पावधीतच  5000 views झाले. माझ्या  काव्यपुष्प  परीवारातील सर्व सदस्य  आणि लिपी परीवारातील   सर्व  सदस्य,  SSKP -group  मधील बाल मित्र मैत्रिणी, माझे आप्तस्वकीय  आणि  आदरणीय सोनू मामा  आणि  त्यांच्या  मित्र परिवार  आपण सर्वांचे मनःपूर्वक  आभार. आपल्या धावपळीच्या  जगण्यात  ही वेळात वेळ काढून  आपण माझं साहीत्य  वाचतात. या अमूल्य  सहकार्यासाठी  खूप खूप धन्यवाद. आपली साथ म्हणजे  जणू कस्तुरी  सतत दरवळणारी. ही साथ  अशीच  रहावी अशी अपेक्षा  आणी हक्काची विनंती...... 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                             शाही.... ✍️✍️ 

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...