चढ उतार ही येतील .....
आणि कठीण वळणही येतील.....
तुझ्या माझ्या प्रेमाची परीक्षा.....
सगळेच रे अशी घेतील....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वळणाची भीती नको गं घेऊ....
सोबती मी असतांना....
चढ उतार ठरलेले तरीही .....
दिसावी मज गं तू हसतांना ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुर्लक्ष तुझं करणं.....
आणी अबोल ते होण.....
नको वाटतं असं वळण...
जीवनात कधी रे येणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भिती वाटते त्या वळणाची.....
दोष नात्यात एकमेकांचे रे दिसतात......
समजून घेणे ठरलेले तरीही ......
दुनियादारीत नाते ते फसतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ठरलेले चढ उतार.....
लढणं अपरिहार्य रे करून जातात....
भीती असली वळणाची तरीही.....
ओढ जगण्याची ठेऊन जातात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगता कुठे येत.....
संकट कुठलं अंगावर येईल.....
भीती असते मनात....
जगणं वळण कसं घेईल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या वळणावर पून्हा.....
तू असल्याचा भास झाला......
वेड्या मनाला पून्हा......
भूतकाळाचा ध्यास झाला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भिती मला त्या वळणाची.....
आपलेच परकेपण जतवून जातात.....
चढ उतार ठरलेले तरीही.....
सल असेही रडवून जातात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वळणाची रे भीती वाटते .....
साथ सख्या देशील ना.....
चढ उतार जगण्याचे चढता....
हात हाती घेशील ना.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️