बंद दारामागे काय?.....
कुतूहलाने ठोठावता गं ते दार.....
गरज कळता फिरून नाही येणार....
सांगू नकोअंतरमनातील वादळ सगळ्यांना बर सार...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्त्रीच ती समजून घेण तीला....
उमजून नाही घ्यायच कुणाला....
मोनालीसाच्या पेंटींगसारख....
कुतूहल फक्त क्षणाला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मौनाच्या तलावात....
प्रश्नाचे खडे किती बर रे मारावे.....
उठणार्या तरंगांचे सांग ना.....
कुतूहल कधी का सरावे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या बदलण्याच कुतूहल.....
क्षणात रे तेव्हा सरल.....
अंधार पडता सावलीनेही.....
होत न जेव्हा एकट सोडल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुतूहल हे जणू.....
अवखड रे घोडा......
संयमाची लगाम लावता.....
थांबत नाही तो थोडा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बघ्याची भुमीका निभावतोय.....
आज तो समाजात बर.....
कुतुहलाने प्रश्न पडणार्या बालमनाला.....
नेहमी गप्प केल्याची ही का रे शिक्षा खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाविन्याच कुतूहल......
निसर्गाची गोड रे खेळी.....
जगण्याची वाढावी उत्सुकता.....
सांगावा हा त्यात रे प्रत्येक वेळी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुतुहल सरता......
प्रेम ही का सरत.....
प्रेम की वासना अंतर....
यावरून का ठरत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुतूहल वाटत......
गळणार्या त्या ढगांच.....
का बर रडतात.....
दूःख कळेना कधी त्यांच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रत्येक गोष्टीला जाणण्याच....
कुतूहल तीला भारी.....
काही गोष्टीची अनुत्तरीतच.....
कस सांगू गंम्मत असते सारी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नभातील शशीला पाहुन....
कुतुहल वाटत....
हा ही लीहण्यासाठी का....
रात्र रात्र जागतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लहान मुलांसारख....
असाव वेड मन.....
कुतुहल जीवनाच.....
रहाव क्षण क्षण.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️