15 October 2021

सांगू कशी...15-10-21

तु समोर आलास कि ....
मी रे मूक  होते.....
तु निघुन  गेल्यावर  वाटते ....
सांगायचे तर  खूप  होते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या  शब्दसरिंमध्ये.....
खुपदा मी भीजलेली.....
सांगु कशी वेड्या तुला.....
माझ्यात मी न उरलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमाची सर  ती.....
मनाची  सल होऊन गेली..... 
तुझ्या  नोकराच्या भितीने.... 
सांगायची ती राहुन गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आई बाबांच्या डोळ्यातील सर ....
तिला  अशी  अडवून घेते .....
सांगायचं  असतं  खुप  काही .....
पण बेगडी हसुत  लपवुन  घेते  ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  
                         शाही... ✍️✍️

3 comments:

  1. अतिशय अप्रतिम रचना सखी ✍️🌟

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिमच 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...