19 October 2021

गणीत उणे बेरजेचे..... 19-10-2021

तुझ्या, सोबतचा प्रत्येक क्षण ....
मी  जपून ठेवलेला ....
उणे बेरजेच्या खेळातून ....
अलगद  लपवून ठेवलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरीज करता करता .....
एक  सल रे जाणवून गेली..... 
सुटलेल्या हातांना कुठे मांडू.... 
दुनियादारी शिकायची राहून गेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेच्या खेळामध्ये .....
खूप  काही ग गमवून बसले.....
आई आली ग बेरजेला.....
बाबांना पण  हरवून बसले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक विचारलं तर ....
खर ना रे सांगशील ....
उणे बेरीज करतांना.... 
मला कुठे मांडशिल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेचे  गणित .....
नाही  रे जमत मला....
तुला बेरीज करुन......
शून्यात धरते मी मला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या  सोबतच्या क्षणांना.... 
गणीतात  कसं ना, मांडाव .... 
साऱ्या  निरपेक्ष भावनांशी ....
अनोळखी  होऊन कसं ना भांडाव ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा हा खेळ .....
सोपा  होता मांडायला..... 
समाधान  धरले  गाठीशी की..... 
काहीच रहात, नाही  गमवायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                          शाही... ✍️✍️

12 comments:

  1. खुप छान रचना आहेत 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

      Delete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. Wah wah di khupch sundhar lihales g apratim rachna shabdha gumfan tr apratim keley khup khup khup chan 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  4. MashaAllah...bahot hi beautiful line banaya.....Salute to you..������������

    ReplyDelete
  5. खूप खूप छान शाहीन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. वाह!!खुप खुप सुंदर✍🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...