22 October 2021

दिरंगाई.... 22-10-2021

नातं हे खोट्यावर.....
नसत रचायचं......
दिरंगाई  का होईना .....
सत्य हे  कळायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दिरंगाई झाली नी.... 
गुपीत हे  कळले होते .....
अव्यक्त राहून मी....
स्वतःला च छळले होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कळावं तुला असं....
खूप  काही  घडलेलं....
दिरंगाई झाली नी.... 
ओठातच अडलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय वेळेवर  घडावं ....
हे ही  होते  रे कळायला ....
दिरंगाईत  नको....
जगणं हे सरायला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला  कळू नये म्हणून .....
दिरंगाई  जाणून केलेली.... 
तु समोर येताच मी.... 
तुझ्यात हरवून गेलेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही... ✍️✍️

9 comments:

  1. अतिशय उत्तम लेखन ✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. Khupch sundhar lihales di🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. खुप छान रचना केल्या आहेस

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

    ReplyDelete
  5. खूप छान👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...