26 November 2021

अनुभवाचे मोल... 26/11/2021

प्रेमाशी माझं नातं....
तू येण्यान जुळून गेल...
त्रयस्थपणे  पहातांना....
अस्तीत्चच  तुझ्यात विरून गेलं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

धो..धो..  कोसळणारा पाऊस....
आठवण तूझी देऊन गेला....
भेटीसाठी आतूर तुही....
जणू निरोपच हा सांगून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्रयस्थपणे  स्वतः कडे पाहतांना .....  
डोळे  हे गळून गेले.....
माझ्या  गैरसमजांचे गणीत......
अनुभवाने मांडून दीले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनुभव असा जणू...
परीसच तो आहे....
सोबतीला असला म्हणजे ...
जगणेच अनमोल  आहे ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयाने अनुभव ....
गाठीशी तो येत नाही ....
जगण्यातले खाचखळगे ....
शिदोरी  ही देऊन जाई.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनातला  प्रत्येक  क्षण....
गोड  आठवणी  होऊन जातो ....
चांगल्या  वाईट  अनुभवांची....
शिदोरी तो देऊन जातो ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनुभव  असा कधी....
जणू गोड  सखा होऊन जातो....
सोबतीचा हात देऊन ...
आत्मविश्वास  तो वाढवून जातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही...... ✍️✍️

        


14 comments:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏😊😊

      Delete
  2. या गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. या गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟🌟

    ReplyDelete
  5. Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

      Delete
  6. वाह!!!! जबरदस्त

    ReplyDelete
  7. खुप खुप सुंदर लिहिल....अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🌹🌹💖💖

    ReplyDelete
  8. Apratim rachna khupch sundhar 🥰🥰🥰🥰🥰💞💞💞💞💞💞💞💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...