आजच आले गृहप्रवेश करून तूझ्या बंगल्यात ,तूझी अर्धांगीनी म्हणून.
सारखा नवीन...
हे अंगण, ही नाती, ह्या रीतीभाती..
त्यातच भर सांगण्याची,
बदलावी लागेल तूला पध्दत
तूझी जगण्याची.
नकळत ती हरवते शून्यात
आणि आठवते तीला-
तीचा तो बालहट्ट,
आपल्या शेजारच्या अंगणातील
इवली 'रोपटे "आपल्या अंगणात लावण्याचे.
त्यावर बाबांचे तीला समजवणे,
राजा अग, बीज ज्या मातीत
रुजते, तिथेच तर ते
वाढते, बहरते आणी जगतेही.
दुसरया मातीत रूजणासाठी,
त्याला लढावे लागेल.
आज तीला आपणही त्या
रोपासारखे वाटतोय,
ती नकळतच म्हणते,
माझ्या त्यावेळच्या बालबूध्दीला
जेसमजल ते का नाही समजत
सगळ्यांना?????!
अस तर नाही ना, ते रोप होत
झाड होणार
आणी मी तर वेल आहे
दुसरयांच्या आधारावर वाढणार.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️✍️
-
अप्रतिम खूप खूप खूपच छान👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteगोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर लिहिल....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫💖💖💖💖🙏🏼🙏🏼
ReplyDeleteKhup khup khup khup khup chan 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐
ReplyDelete