29 November 2021

हाती काही लागले नाही.. 29/11/2021

तीच्या क्षमतांचा सुगावा....
यमाला ही कुठे लागला.....
सावित्री होऊन ती लढली....
आणि  यमही म भागला..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कुणी घेतच नाही ....
तीच्या मनाचा सुगावा....
समजून  घेणारं कुणी असा...
वाटत खुपदा गाठावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगावा नाही  ग लागला....
भटकंती  का आयूष्याची....
प्रत्येक  वळणावर अनामिक भीती....
हाती काहीही न  लागण्याची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनरुपि अथांग सागराचा....
कुठे लागतो सुगावा....
विचारांच्या भरती ओहोटीत.....
नाही  ग क्षणाचा विसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगावा लागला  नाही...
सुत्र नात्यांची  ग बदलत गेली ....
राग आणि  मत्सरामुळे....
ओंजळ नात्यांची रिती ग होतं गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी बर असतं....
सुगावा कसला लागत नाही ....
अपरिहार्य  आहे ते जगणं...
कळून ही खुपदा हाती काहि  लागत नाही ..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगावा  लागला  नाही ....
मनातील गुपिताचा.......
हाती काही  लागले  नाही....
अंत असा सगळ्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाती लागल्या  नाही....
आठवणिंच्या त्या पाऊलखुणा ....
सुगावा लागण्या आधीच....
लाटेने वाहुन नेले सारे पून्हा ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगावा  लागू दिला  नाही ....
तर हाती काय लागणार....
अबोला देऊन  निघून गेला ....
नभातील शशी  सोबत आताराती जागणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही..... ✍️✍️


7 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना ..👍👌✍️🍫

    ReplyDelete
  3. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  5. अप्रतिम लिहिता तुम्ही मी तुमच्या शब्दाच्या
    प्रेमात हो पडते ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  6. खूप सुंदर रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...