तीच्या क्षमतांचा सुगावा....
यमाला ही कुठे लागला.....
सावित्री होऊन ती लढली....
आणि यमही म भागला..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कुणी घेतच नाही ....
तीच्या मनाचा सुगावा....
समजून घेणारं कुणी असा...
वाटत खुपदा गाठावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुगावा नाही ग लागला....
भटकंती का आयूष्याची....
प्रत्येक वळणावर अनामिक भीती....
हाती काहीही न लागण्याची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनरुपि अथांग सागराचा....
कुठे लागतो सुगावा....
विचारांच्या भरती ओहोटीत.....
नाही ग क्षणाचा विसावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुगावा लागला नाही...
सुत्र नात्यांची ग बदलत गेली ....
राग आणि मत्सरामुळे....
ओंजळ नात्यांची रिती ग होतं गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी बर असतं....
सुगावा कसला लागत नाही ....
अपरिहार्य आहे ते जगणं...
कळून ही खुपदा हाती काहि लागत नाही ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुगावा लागला नाही ....
मनातील गुपिताचा.......
हाती काही लागले नाही....
अंत असा सगळ्याचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हाती लागल्या नाही....
आठवणिंच्या त्या पाऊलखुणा ....
सुगावा लागण्या आधीच....
लाटेने वाहुन नेले सारे पून्हा ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुगावा लागू दिला नाही ....
तर हाती काय लागणार....
अबोला देऊन निघून गेला ....
नभातील शशी सोबत आताराती जागणार...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteखूप सुंदर रचना ..👍👌✍️🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteअप्रतिम लिहिता तुम्ही मी तुमच्या शब्दाच्या
ReplyDeleteप्रेमात हो पडते ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDelete