13 December 2021

म्हणणे इतकेच... 13/12/2021

म्हणणे  माझे  इतकेच.....
समजून  तु घेतले असते....
मौनाच्या वादळात....
अडकणे घडले नसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बडबड ही नको त्याला....
मौन ही नको असतं.....
म्हणणे इतकेच की.....
इतक गुंतण कुणात रे बर नसतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला पहाता.....
मौन माझं रे बोलक होतं....
म्हणणे  इतुके च की.....
स्वतःला  ही रे म भुलण होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे माझे  इतुकेच......
चुकते  कुठे  कळत नाही  मला....
मौन तुझं बोलकं  तरीही.....
सांगायला हव तेच सांगत नाही  मला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे माझे  इतुके....
समजून घेशील....
मौन तुझे बोलके ....
क्षणभर सारशील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौन तुझं बोलकं.....

खूप  काही  बोलून  गेलं.....
मनातील गुपीत तूझ्या.....
मनात माझ्या  ठेऊन गेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अबोली ती माझी....

मौनातून बोलते....
म्हणणे माझे  इतकेच म्हणता....
क्षण क्षण गुंतवून घेते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बोलघेवडा तो माझा....
मौनातूनही बोलतो....
रुसव्या फुगव्याचा खेळ....
त्याच्या डोळ्यातून घडतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौन ही तूझे....
बोलायचे किती....
अर्थ  हवे ते....
लावायचे किती...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे  माझे  इतुकेच.....
नाही  समजले त्याला....
मौन तुझे बोलके....
म्हणून  ही गेला मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  मौनाला ही.....
हवे ते अर्थ दिले....
बोलके ते की गैरसमज....
इतकेच समजायचे होते  राहीले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


5 comments:

  1. खूपच सुंदर 👌👌👌💐💐💐

    ReplyDelete
  2. Khupch sundhar khup khup chan rachna di 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर रचना👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिऊत्कृष्ट....����������������������������������������

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...