म्हणणे माझे इतकेच.....
समजून तु घेतले असते....
मौनाच्या वादळात....
अडकणे घडले नसते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बडबड ही नको त्याला....
मौन ही नको असतं.....
म्हणणे इतकेच की.....
इतक गुंतण कुणात रे बर नसतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला पहाता.....
मौन माझं रे बोलक होतं....
म्हणणे इतुके च की.....
स्वतःला ही रे म भुलण होतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
म्हणणे माझे इतुकेच......
चुकते कुठे कळत नाही मला....
मौन तुझं बोलकं तरीही.....
सांगायला हव तेच सांगत नाही मला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
म्हणणे माझे इतुके....
समजून घेशील....
मौन तुझे बोलके ....
क्षणभर सारशील....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मौन तुझं बोलकं.....
खूप काही बोलून गेलं.....
मनातील गुपीत तूझ्या.....
मनात माझ्या ठेऊन गेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अबोली ती माझी....
मौनातून बोलते....
म्हणणे माझे इतकेच म्हणता....
क्षण क्षण गुंतवून घेते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बोलघेवडा तो माझा....
मौनातूनही बोलतो....
रुसव्या फुगव्याचा खेळ....
त्याच्या डोळ्यातून घडतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मौन ही तूझे....
बोलायचे किती....
अर्थ हवे ते....
लावायचे किती...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
म्हणणे माझे इतुकेच.....
नाही समजले त्याला....
मौन तुझे बोलके....
म्हणून ही गेला मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या मौनाला ही.....
हवे ते अर्थ दिले....
बोलके ते की गैरसमज....
इतकेच समजायचे होते राहीले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
खूपच सुंदर 👌👌👌💐💐💐
ReplyDeleteKhupch sundhar khup khup chan rachna di 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर रचना👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिऊत्कृष्ट....����������������������������������������
ReplyDelete