संवाद स्वतःशीच जेव्हा ....
होतो ना रे शांत .......
नको वाटतो मला......
तसा रे तो एकांत ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको वाटतो गं अबोला.....
एकांतात तो तुझा.....
तुझ्या त्या बडबडीत .....
रमतो गं जीव माझा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
, संवाद स्वतःशी साधता......
वेगळीच रे उकल झाली....
तूझ्यात मी विरल्याची.....
कितीदा ती दखल झाली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको असलेला एकांत ही.....
शाही गोड तेव्हा वाटून गेला ....
तुझ्या शब्दफुलात माझा.....
भास जेव्हा गं हसून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नकोसा वाटतो....
मला तो एकांत .....
माझ्या आपल्यांची.....
नको पडावी त्यात भ्रांत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःशी उत्तम....
संवाद मी साधून घेते.....
एकांताची अशी.....
कधी मी .भांडून घेते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सक्तीचा एकांत....
नकोसा रे वाटतो....
जणू आपलंच कुणी....
दुर आपल्याला टाकतो
...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नकोसा वाटतो ....
मला तो एकांत.....
जवळ असूनही जेव्हा ....
बसतो तू शांत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःशी उत्तम .....
संवाद मी साधून घेते ....
तुझ्या सोबतीने मी....
स्वतःला नव्याने जाणून घेते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडतं मला.....
स्वतःशी संवाद साधायला....
सोप जात मग....
शब्दात सगळ बांधायला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊😊
Deleteअतिशय सुंदर काव्य रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
DeleteKhup chan...
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏🙏😊😊
Deleteअतिशय सुंदर रचना
ReplyDeleteKhupch sundhar👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete