का म्हणून छळावं स्वतःला .....
क्षुल्लक कारणांसाठी .....
ज्यांना कदर नाही आपली......
का फिरावं अशांच्या पाठी.....
क्षुल्लक कारणं असतात माझी.....
का म त्यात तू गुंतून जातो....
मी उगाच असं छळते स्वतःला ....
त्रास तुला का म होऊन जातो ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छळले होते
क्षुल्लक ते बोलणे
पोल खोलणे
छळले होते
दोष दाखवलेले
रागवलेले
छळले होते
अपेक्षांचे वादळ
सांग सरळ
छळले होते
जाणुन ते टाळणं
अश्रृ गाळणं
छळले होते
स्वार्थी ते वागणे
मन लागणे
छळले होते
आवरले नाही मना
चूकच होना
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावनाही कधी कधी.....
का अशा छळत असतात......
अबोला धरून क्षुल्लक कारणांवरून....
डोळ्यातुन गं म गळत असतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भास आणि स्वप्नांमध्ये .....
का रे ते छळणं असं......
मनामध्ये तू लपलाय
हेच जणू सांगणं जसं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षुल्लक कारणं होतं......
नजर नजरेला भिडली होती......
अव्यक्त प्रेमाने असं छळलं.......
दोघेही विरहात रडली होती ......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
का रे मना सांग ना तु......
का उगाचच छळत असतो....
गुण दोषांचे क्षुल्लक कारण देऊन ...
भाव मनातील टाळत असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Apratim rachna kelis di khupch sundhar ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
ReplyDelete