07 February 2022

बालपणीच्या आठवणी....7/2/2022

आठवते ती खोडकर आठवण.....
प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची ती खोटी सही....
होमवर्क नाही केला म्हणता आठवते....
घरी राहीलेली ती वही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
चीऊ काऊ म्हणता आईच ते भरवणं...
पंचपक्वान कीती खाल्ली पण.....
नाही रे ती सर येण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतो ना कोल्डड्रिंकच्या झाकणाला....
दोरी बांधून केलेला बिल्ला....
आजही हवासा वाटतो...
किनार्यावरचा वाहून गेलेला तो किल्ला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भातुकलीचा तो खेळ.....
खुपदा रे मांडून पाहीला....
बालपणासारखा आनंद....
नाही रे आता घेता आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपण तर हरवल....
पण तो खोडकर पणा जपूया....

वेळेलाही अशी कधी.....
खोडकर शिक्षा  देउ या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कैरी आणी बोर म्हणे.....
स्वतःच आता गळून जातात.....
नेम मारून तोडणार बालपण.....
मोबाईल मध्ये हरवून जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणाचे किस्से आठवता.....
ओढ बालपणाची लागली.....
मोठे होऊन काय कमावले म्हणता....
होती रे वजाबाकी जागली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    



कळलं का आजही रे.....
ह्या बालपणीच्या प्रश्नाच उत्तर....
रात्रभर गळणारा पाऊस......
शाळेच्या वेळी कसा होतो शांत नी नीरूत्तर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत जाणवले.....
खेळभावना कुठे तेव्हा कळायची.....
हरणं -जींकणं बाजूला ठेऊन.....
मैत्री कशी ना सहज ती जींकायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत
अपेक्षा,व्देश,जातीभेद नव्हता यांचा लवलेश
आता कळले चुक काय ते
का वाढता  मोठेपणी रे क्लेश

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतो का रे तो प्रश्न....
मोठं झाल्यावर काय ते व्हायचे?.....
उत्तर आता चल सांगू सगळ्यांना....
बालपण आहे रे पून्हा जगायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत आठवता का....
धपाटे शाळेत न जाण्यासाठी पडलेले....
आज त्याच शाळेच्या आठवणीत....
अश्रृ किती ना गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


1 comment:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...