मुक्या प्राण्यांवर दया.....
आणी गरजूंना मदत....
माणूसकी आणी प्रेमाने...
भारतीय संस्कृती असते सजत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अव्दैतभाव हा......
महत्वाचा घटक भारतीय संस्कृतीचा.....
समाजात वावरतांना.....
भान आपण हा जपायचा....
अव्दैत-- आपल्या सारखेच इतर आहेत ही संकल्पना
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निरोगी राहण्याचा संदेश.....
भारतीय संस्कृती ठेऊन गेली.....
योगविद्या आणी आयुर्वेदातून.....
महत्व याचे जतवून गेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाहीलं का कधी तू बीज अंकुरतांना....
हात जोडून जमीनीवर रोप येतांना....
आभाराची परंपरा संस्कृती आपली....
निसर्गाने ही गोड ती जपली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आहेच मी खरंच भाग्यवंत....
भारतभूमीवर जन्म तो झाला.....
खंत एकच बंधूप्रेमाच्या संस्कृतीत....
का राजकारण जाती पातीचा आला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खाद्यसंस्कृती अशी......
भलीमोठी लाभलेली......
प्रत्येक राज्याने आपली.......
पारंपारीक पदार्थांची चव जपलेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नृत्य संगीत उत्सव....
राज्या राज्यांचे वेग वेगळे....
विविधतेने नटलेले.....
संस्कृतीचे रूप सगळे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था....
भारतीय संस्कृतीची जान.....
लेकरांना मीळावे संस्कार....
अन संगोपन हा त्यात लपला मान....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️..
.
खुप गरज बर.....
संस्कृती ती जपण्याची....
नाहीतर कठीण बर....
प्रगती ती देशाची.....
गुरू शीष्य परंपरेला....
भारतीय संस्कृतीत मोठ स्थान.....
दोघांनी जपावी नात्याची गरीमा....
करावा आपल्या संस्कृतीचा सम्मान....
सुंदर चारोळी संग्रह ✍️👌👌👌
ReplyDelete