17 May 2022

चारोळी संग्रह.....चारोळी

आई बाबांना भारतीय संस्कृतीत....
देवत्व आहे ना दिल.....
वृध्दाश्रम उघडून आपण.....
का पाश्चीमांत्यांच अनुकरण केल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लीहीणार्याच्या लेखनात....
संस्कृती ती जतन होते....
आणी ज्ञानसंवर्धन ते....
वाचकांसाठी ठरते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

महान आपली भारतीय संस्कृती....
स्त्रीला देवत्व देऊन गेली.....
आपण कमी पडलो जपायला हिला....
निर्भया ही जाणीव ठेऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपासना,त्याग, संयम .....
सहीष्णुता यांच मीश्रण बर....
भारतीय संस्कृतीतच आहे.....
अंधारा कडून प्रकाशाकडे नेण्याच बळ खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कृतीत दडलेली.....
व्यवहारी ओळख बर....
सार्वभौमिक मानवि आणी...
अध्यात्मीक मुल्यांची खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कृती म्हणजे.....
सर्वसमावेशक कृती......
पुरातन परंपरा जपणारी......
आहे ती भारतीय संस्कृती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इतीहास,विलक्षण भुगोल आणी.....
वैविध्यपुर्ण जनजीवन बर.....
यामुळे  आकाराला आली.....
भारतीय संस्कृती खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रंग भाषा भेद......
आहेत वेगवेगळी......
तरीही एकत्र नांदतात.....
भारतीय संस्कृतीत सगळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रंग भाषा भेद......
आहेत वेगवेगळी......
तरीही एकत्र नांदतात.....
भारतीय संस्कृतीत सगळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विवीधतेतून एकात्मता....
देशात माझ्या दिसते....
यातच माझी भारतीय संस्कृती....
किती छान हसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्या संस्कृतीने.....
विश्वालाच कुटूंब म्हटल.....
भारतीय संस्कृतीचा गर्व.....
मज आहे म्हणून म्हटल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भारतीय संस्कृती....
जगात महान.....
शब्द कमी पडतील....
किती गाऊ मी गान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️..


1 comment:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...