26 June 2022

चारोळी संग्रह....

समाजसेवेच्या कांडीने....
शिक्षणाची जादू केली ....
सावित्री बाई खरच ना.....
पर्रांची महाराणी होऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इतीहासातील एक....
परी गं आज आठवून गेली....
झाशीची राणी ती....
देशासाठी प्राण होती जी देऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परदेशातून आली होती....
मानवता ती शिकवून गेली....
मदर टेरेसा नावाची परी...
आज पुन्हा गं आठवून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सिंधूताई आपली होती ना.....
अनाथांची परी....
अनाथांनाच कळते गं....
महती तीची खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुखी संसाराच त्याच स्वप्न.....
आहे ग अजून अपुर्ण.....
गोड त्याला परी हवी....
असेल त्याच विश्व ती संपुर्ण..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांच्या सुखासाठी.....
नेहमी झटत राहीली.....
एक अशी परी मी.....
आईच्या रूपात ही पाहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्न आहे की आहे परी.....
की वेडू तू  गं कल्पना.....
खर सांगू तूच ग वेडी.....
माझ्या जीवनाची संकल्पना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाऊसात भीजता.....
वाटली जणू जलपरी.....
खुप झाले भास वेडू.....
येऊन भेट कधीगं खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक असते म्हणे.....
जणू एक परी.....
का आहे समाजात......
परकेपणाची  मग ही दरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परीकथांच ते जग.....
छान होत रमायला.....
बालपण नको होत.....
कधी रे ते सरायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटावी एक परी.....
जादू अशी करणारी.....
दुःख सगळ्यांची दूर सारून....
सुखाने जीवन भरणारी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक आपल्या आई बाबांची....
असतेच ना परी.....
तरीही होते परकी.....
कळेना कहाणी खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटत यावी....
एक छान गं परी....
माझी सावली....
असावी ती खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️   


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...