पक्षी कसा उडतो.....
पंखांच्या जोरावर.....
नाही जमवत अन्नधान्य .....
भरवसा पंखांच्या बळावर ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बंधनांचे पींजरेही......
ध्येय तु म्हणता तोडले असते....
भरारी ही तुझ्यासाठी......
कधी तरी तुला कळले असते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उंच भरारी घेण्यास.....
आशिर्वादांचे पाठबळ मीळावे बर....
आपल्यांच्या सोबतीने.....
यशाचे शिखर सहज होतात खर ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बांध गाठ ग.....
जीद्द नी प्रयत्नांची.....
अंधार पीऊन उजळेल....
कहाणी संघर्षाची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नित्य ठेव मनी....
ध्यास प्रगतीचा....
प्रयत्नांनी मीळतो....
मार्ग उन्नतीचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
घे ग भरारी आता....
वादळाला नाही घाबरायच....
पंखात आहे ग बळ....
आता करून काही दाखवायच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खूप झालं ग वाटं पहाणं....
येईल कुणी लढेल आपल्यासाठी....
तूच तुझे बळ बनकी.....
घे भरारी ऊडण्यासाठी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उंच भरारी
बाणा ठेव करारी
हिच उभारी
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संस्कृती चे बळ घेऊन......
मी का भरारी मारू नये......
अडगळ सारून परंपरेत रमणे.....
प्रगती याला का जाणू नये....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीच्या आपल्यांनीच दिला....
भरारी घेण्याचा ध्यास....
धीक्कारून रूढी तीनेही.....
घेतला मग निर्भीड श्वास....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments