25 October 2021

सख्या रे.. चारोळी

सांजवेळी  तुझ ते अंगणावरून रे जाण...
गाली  हसून  ते वळून पहाणं... 
पुन्हा  कधी  व्हाव...
त्या सांजेला फिरून येणं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उनाड पणा करता करता ....
खोडकर  सख्या होउन  गेला....
मनात मीच दडली त्याच्या.... 
हळुच कानी  सांगून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जपून ठेवलेले सुख सारे...
आज सख्या तुला देते....
तुझी सारी दुःख.... 
पदरी मी माझ्या  घेते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                       शाही..... ✍️✍️

तूझी कांकण... कांकण

मी आणि माझे शब्द .....
तुझ्यात हरवतो.....
तुझ्या  हातच कांकण व्हाव....
स्वप्नात  ग ठरवतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या  काकणात किणकीणतांना ...
हरवलेले शब्द ....
गवसले मला ...
मी शोधत असतांना ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवत मला आजही ....
तुझ ते रूसण....
काकणाच्या किणकीणीत...
संवादात फसणं..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                      शाही.... ✍️✍️
     

24 October 2021

शब्द... 24 -10-2021

डिजिटल  युगाची .....
शब्द हिच जान आहे ....
दूराव्यातही  नाती  जपतात....
किती हे छान आहे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁हरवलेले ते शब्द ....
शोधत असताना..... 
गिरवले आसवांनी ....
विरह तूझा  जपतांना ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कल्पनाही  नको  आता ....
शब्द  ते हरवल्याची ....
यातना कठीण रे.... 
आपल्याशी दुरावल्याची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                    शाही.... ✍️✍️

भूतकाळ उकरुन काढत नाही... 24-10-2021

भूतकाळ उकरुन ....
मी नाही रे काढत.....
पण क्षण ते जगण्यातले ....
मी नाही गाळत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भूतकाळ उकरुन ....
मी काढत नाही.... 
अस सर्व  जाणूनही.....
माणूस कळतोच असे रे वाटत  नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जगणं हे कोड नी .....
ओढ भविष्याची त्यातली ग गम्मत ...
उकरून  भूतकाळ करू नको ...
उगाचच  कमी त्याची ग  किंमत ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भूतकाळात खुपदा......
तुझ्यासोबत  रमून घेते ....
दुःख  सारे असे .....
ओंजळीतले सांडून देते  ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁.
                  शाही.... ✍️✍️

23 October 2021

संवाद.. 23-10-2021

उचकी ती लागताच ....
सांगावा तुझा  कळतो... 
अबोल आपला  संवाद ....
 खुपदा  असाही घडतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या माझ्या संवादाची ....
रित  किती गोड  आहे.... 
अवांतर  बोलूनही.... 
एकमेकांची ओढ  आहे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगायच  राहूनच  जात..... 
शब्दच  मौनात  पडतात....
भावनांचे आणि  शब्दांचे....
संवादच आता  कुठे  घडतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही.... ✍️✍️

 


 

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...