20 November 2021

कैफ तुझा.. 20/11/2021

कैफ तुझ्या  भेटीचा...
कसा रे चढलेला ...
वळणा वळणावर उभा तुच...
भास  कसा हा छळलेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिल्या  नजरभेटीची कैफ...
नाही ग सरलेली....
प्रतिबिंब  पहाता आरश्यात...
छबी तुझीच  ग उरलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कैफ हा प्रीतीचा....
असा रे रेंगाळला ....
माझ्यातला मी पहाताही...
भास तुझाच झाला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कैफ हा प्रेमाचा ....
नकळत त्याग शिकवून गेला ...
अनोळखी व्यक्तीसाठी ही....
कसं न स्वतः ला हरवून नेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही..... ✍️✍️


19 November 2021

राग... 19/11/2021

तुझ्यावर रागवणं हा....
तुला आठवण्याचा बहाणा आहे....
तू आला की खुदकन हसतो....
तसा  राग माझा शहाणा आहे.... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रागाचा फायदा घेऊनच....
राजकारण खेळतात....
जातीभेद घालून....
मतभेद छळतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राग हा तसा कधी....
खोडकरपणे वागतो...
बाबांना पाहून लपतो...
नी आईवर हव तेव्हा रूसतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राग आला की....
गुणांवर सावट येत....
जातांना याच्या सोबत ...
माणुसकीच जाणं होत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही..... ✍️✍️

जेव्हा राग आला... 19/11/2021

रागात बोललेले शब्द ....
हवेत विरून जातात.....
सल होऊन  काळजात....
नेहमीच राहून जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम  असो की राग.....
मर्यादेतच गोड  आहे ....
अती त्यांची झाली की....
विक्रृतीची ती खोड आहे ..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कप बशीची जोडीच जणू असंच.....
आपल नातं व्हाव...
तू कितीही राग  ओतला तरी....
संयमाने मी  सामावून घ्याव...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मला राग आला तर.....
तूला मनवायला येईल ना....
बघ म संसार सुखाचा....
आपला किती तो होईल ना...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही... ✍️✍️


18 November 2021

हायकू-गुंफलेले क्षण। 18/11/2021

गुंफलेल्या  या
क्षणांना सांभाळू या
दोघ मीळूया

गूंफलेले  हे
क्षण कर्तव्य  का रे
लेकरांचे हे

गूंफलेले हे
क्षण उसवलेत
सावर तू  हे

गूंफलेले हे
क्षण मनातच का
साठून राहे

गूंफलेले हे
क्षण कण नी कण
सुटणे नहो

गूंफलेले  हे
क्षण की भावनेचे
रूदण का हे


सख्या रे!!.. 18/11/2021

म्हणतो कसा तू - तूला भेटलो का.....
दिवस सरतो ग  क्षणात ......
न चुकता येतो राजा......
भेटायला म स्वप्नात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज सकाळपासूनच......
उचक्यांनी कहर रे केला.....
आत्ता  आठवले रात्री......
स्वप्नात  तू भांडून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंफलेल्या  या क्षणांना.......
ठेवतो आठवणींच्या  गोड  कूपीत......
तेच मन का नाही  समजून घेत.......
जे असते ह्या क्षणांच गूपीत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाहीच जगू शकणार त्याच्या शीवाय.....
हे त्यालाच नाही सांगू शकले.....
बंधनांची माझी ओझी.....
त्यावर नाही  लादू  शकले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही.... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...