अनोळखी वाट गं आई ......
माझ्या स्वप्नांकडे नेते......
दिशाहीन वाऱ्याची चिंता सोडून......
चालण्या हात तुझा माझ्या हाती का देते ?....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ऐक ना!, राजा थांबशील ना.....
अनोळख्या वाटेवर माझ्यासाठी...
बघ ना तो दिशाहीन वारा....
लागलाय रे माझ्या पाठी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी ती नजर भेट ....
अनोळखी ती वाट .....
खरच का रे जुळून येईल...,
तुझी माझी रेशीमगाठ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी वाट....
चाल गं खंबीरपणे .....
खेळ नाही गं जगणे.....
समजून घे हे गंभीरपणे .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सोबत मागू
दिशाहीन गं वारा
नको पसारा
चालू पहाते
अनोळखी वाट ना
हो दे साथ ना
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको दिशाहीन वाऱ्याची सोबत....
उगाच तो छेडत असतो....
उगाच बट केसांची उडवून .....
लगट अशी तो साधत असतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको दिशाहीन वाऱ्याची सोबत....
उगाच तो छेडत असतो....
उगाच बट केसांची उडवून .....
लगट अशी तो साधत असतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळख्या वाटेवर .....
चालता मन रूळलं......
ओळखीच्या वाटांवर......
अपेक्षाभंगांनी रे छळलं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मागितली सोबत.....
दिशाहीन त्या वार्याला.....
अनोळखी वाटेवर बघना.....
उभा तो रे पहार्याला .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️