07 February 2022

चारोळी संग्रह.... 7/2/2022

बालपणीच्या आठवणीत आठवता का....
धपाटे शाळेत न जाण्यासाठी पडलेले....
आज त्याच शाळेच्या आठवणीत....
अश्रृ किती ना गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
आई ती स्वस्थ नी निरोगी दिसली.....
वयोपरत्वे आलेले परावलंबत्व पहात....
मनात होती फास रेफसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
एक गोष्ट छान होती.....
निरागस त्या मनाला.....
दुःखाची कुठे जाण होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत....
जपलाय ना रे तो पाऊस....
ती होड्यांची गंम्मत....
आणी भीजण्याची ती  हौस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत......
सखींसोबतचे खोडकर क्षण.....
त्या गमती जमती आठवता....
हुरहुरते भेटीस  गं मन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या त्या आठवणी......
गुपीत गोड सांगून गेल्या.....
आयुष्याच्या पुस्तकाचे बालपणच.....
आनंदाचे पान  रे म्हणून गेल्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती गोड होतं ते.....
कट्टी सो च जगण......
दोष गूण सर्व विसरून....
निरागसपणे वागण.. ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणी त्या बालपणीच्या....
हव्या हव्याश्या वाटतात.....
कितीदा ही आठवा....
त्या नव्या नव्याश्या वाटतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीचा क्षण क्षण....
आहे रे गोड आठवण.....
मनात जपलेली आजही....
सगळी ती साठवण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत....
हरवल निरागसपणाच परीस....
उगाच पडलो ना.....
मोठं व्हायच्या भरीस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणच आहे....
गोड ती आठवण.....
मनात जपलेली.....
आजन्माची साठवण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणी.....
किती ना रे गोड.....
सरता सरत नाही.....
कधी त्यांची ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.....✍️✍️


बालपणीच्या आठवणी....7/2/2022

आठवते ती खोडकर आठवण.....
प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची ती खोटी सही....
होमवर्क नाही केला म्हणता आठवते....
घरी राहीलेली ती वही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
चीऊ काऊ म्हणता आईच ते भरवणं...
पंचपक्वान कीती खाल्ली पण.....
नाही रे ती सर येण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतो ना कोल्डड्रिंकच्या झाकणाला....
दोरी बांधून केलेला बिल्ला....
आजही हवासा वाटतो...
किनार्यावरचा वाहून गेलेला तो किल्ला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भातुकलीचा तो खेळ.....
खुपदा रे मांडून पाहीला....
बालपणासारखा आनंद....
नाही रे आता घेता आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपण तर हरवल....
पण तो खोडकर पणा जपूया....

वेळेलाही अशी कधी.....
खोडकर शिक्षा  देउ या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कैरी आणी बोर म्हणे.....
स्वतःच आता गळून जातात.....
नेम मारून तोडणार बालपण.....
मोबाईल मध्ये हरवून जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणाचे किस्से आठवता.....
ओढ बालपणाची लागली.....
मोठे होऊन काय कमावले म्हणता....
होती रे वजाबाकी जागली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    



कळलं का आजही रे.....
ह्या बालपणीच्या प्रश्नाच उत्तर....
रात्रभर गळणारा पाऊस......
शाळेच्या वेळी कसा होतो शांत नी नीरूत्तर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत जाणवले.....
खेळभावना कुठे तेव्हा कळायची.....
हरणं -जींकणं बाजूला ठेऊन.....
मैत्री कशी ना सहज ती जींकायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत
अपेक्षा,व्देश,जातीभेद नव्हता यांचा लवलेश
आता कळले चुक काय ते
का वाढता  मोठेपणी रे क्लेश

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतो का रे तो प्रश्न....
मोठं झाल्यावर काय ते व्हायचे?.....
उत्तर आता चल सांगू सगळ्यांना....
बालपण आहे रे पून्हा जगायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत आठवता का....
धपाटे शाळेत न जाण्यासाठी पडलेले....
आज त्याच शाळेच्या आठवणीत....
अश्रृ किती ना गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


06 February 2022

चारोळी संग्रह....6/2/2022

मनातील भावनांचा.....
नाही रे तूला किनारा केला....
जरी तू भेट शेवटची....
होता ना देऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऐकना!.....
एकदा भेटायच आहे रे तुला....
पहीली की शेवटची भेट.....
निर्णयाचा हक्क दिलाय रे तुला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवते अजूनही.....
ती शेवटची भेट.....
अबोला तुझा काळजात.....
भीडला होता थेट...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अब्बांची आणी ताईची भेट......
शेवटची ती घडलीच नाही.....
संसार करण्यासाठी माहेर दुरावण्याची.....
रीत आजही कळली नाही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोरोना मुळे किती भेटी.....
शेवटच्या त्या ठरून गेल्या....
किती हात हरवले.....
आठवणी त्या उरून गेल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटची भेट.....
  शाळेची आणी माझी.....
बालपण तीथे हरवल्याची पाऊलखूण....
आहे रे आजही ताजी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट.....
आठवते का तुला....
येईल मी लव कर.....
म्हटला होता मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती भेट शेवटची......
आस ठेऊन गेलेली.....
भेटू कधीतरी म्हणता......
जगण्याच ध्येय होऊन गेलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट......
आणी वळून तुझ पहाण.....
कळल होत मला तूझ.....
अस माझ्यात राहणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट.....
आणी काळजी घे म्हणण.....
कस बर विसराव.....
त्या क्षणात थांबल जगण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही.......✍️✍️


शेवटची भेट.....6/2/2022

आवडेल मला शेवटचा श्वास....
मिठीत तुझ्या रे घ्यायला....
तू सुखी रहावा हीच सदीच्छा असेल....
तेव्हा ही  रे  द्यायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटची भेट  माझी.....
घेशील का तु अशी....
तु मी आणी....
सोबतीला नभातला शशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येऊन भेट ना त्या वळणावर....
सोडून जीथे तू होता गेला.....
तुझीच आहे रे आजही मी....
वचन  सर्व तु का विसरून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाहीरे आठवावी वाटत.....
नातेवाईकांनी दिलेली ती शेवटची भेट....
परीस्थीती बदलता....
अबोला देऊन अपरीचीत झाले थेट...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुठली भेट शेवटची....
आयुष्यात कस सांगायच.....
प्रत्येक भेटीला आनंदाने.....
का नाही मनसोक्त जगायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटच्या त्या भेटीचा....
मनात  होता कालवा....
डोळ्यातला पाऊसही....
होतो रे  म हळवा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का रे पाणवतात डोळे तूझे....
प्रत्येक आपल्या भेटीवर.....
जीव ओवाळून टाकते  रे....
निरपेक्ष तुझ्या या प्रितीवर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येईल गं स्वप्नात.....
भेट  तूझी घ्यायला.....
राहीलेली मिठी.....
घट्ट अशी द्यायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेट ती शेवटची......
का म्हणून गेलास तू......
डोळ्यातील किनार्यांचा साकव.....
सहज मोडून गेलास  तू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रडायच ठरल होत ना....
शेवटच्या त्या भेटीत.....
अश्रृंनीच घेतले पण.....
कसे एकमेकांना मिठीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुठल्याही भेटीला.....
शेवट हा शब्द लागू नये....
नियतीने अपरीहार्य केल्याशीवाय....
नातं कुठलही टाकू नये....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.....✍️✍️


05 February 2022

स्वतःसाठी उभे नाही गं चुकीचे...5/2/2022

बोलणारा जर आपल्या मर्यादा....
वीसरून जात असेल.....
उलटून उत्तर देणे त्याला....
योग्य गं पर्याय असेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लढायच आहे स्वतःसाठी.....
बळ तू होशील ना.....
व्यक्त होतांना शब्दच नाही.....
अर्थ ही समजून घेशील ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच आहे वेड्या माझ......
व्यक्त होण्याच हक्काच ठीकाण....
चुकते खुप समजून घेतो तू.....
आहे रे तुझ्या निरपेक्ष प्रेमाची जाण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी तरी स्वतःसाठी......
लढुन तु पहा.....
तुझ कोण कळेल क्षणात.....
अस ही जगून पहा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः साठी कुठे तो बोलतो....
काळजी सगळ्यांची करत असतो....
बाप,भाऊ,मुलगा,पती होऊन....
शांत  राहून का तू स्वतःला छळत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहण्याला तुझ्या गं.....
अगतीकता म्हटली जाते......
हव तीथे व्यक्त व्हाव.....
अस्मीता ही जपली जाते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वाभीमान आणी अभीमान.....
फरक यातला घे समजून.....
स्वतःसाठी उभ राहतांना.....
गल्लत नको हं घे उमजून......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहणे योग्य नाही.....
व्यक्त होउन बघ गं कधी.....
समजून घेतील तूझे आपले....
नसावी मनात गमवण्याची भीती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मांडली असती बाजू माझी.....
पण खर तुला समजले असते.....
बोट तूझ्याकडे वळता पाहून....
मार्ग तू का बदलले नसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या नजरेतून स्वतःला.....
योग्य अयोग्य ठरवत गेले.....
स्वतःसाठी उभे रहायला हवे.....
पण अस्तीत्व असे हरवत गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळेवर स्वतःसाठी.....
याव गं लढण.....
शांत राहण ही होत.....
स्वतःला ते छळण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही गं चुकीच.....
स्वतःसाठी लढण....
योग्य नाही अस.....
चुक पाहून शांत पडण...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

योग्य अयोग्य काय.....
वेळीच ग कळाव.....
नको तीथे शांत राहण.....
नेहमी गं छळाव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप प्रश्न अशी...
शांत राहील्याने सुटतात.....
शब्दाला शब्द वाढता....
नाती ग तुटतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...