17 May 2023

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे....
वाचुन कुठे कळतात....
स्वतःसोबत घडले तरच....
अर्थ त्यातले वळतात....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे.....
प्रत्येकाचे वेगवेगळे.....
गोळा बेरीज करता त्याची.....
जीवन हे उलगडे....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देत होती ग्वाही.....
प्रामाणिकता आणि मेहनतीला....
पर्याय नाही काही....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
हेही होते पटले.....
छोटया मोठ्या चुकातुनच....
मोठमोठे धडे भेटले....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देऊन गेले समज भारी...
नशिब करते अपेक्षाभंग....
कर्म देतात फळ सारी.....

आयुष्यातल्या पुस्तकातील हे धडे....
महत्वाचे रे वाटले....
सोडून जाणार्यांनी दिलेले धडे....
लक्षात ठेवावे हे पटले....

कर्तव्य पुर्ण करता.....
हक्क आपसुक भेटते....
आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
नेहमी हे पटते....

आयुष्यतल्या पुस्तकातील धडे....
स्वःअनुभवावर मांडले....
धेयाचे चिंतन नि सातत्याने.....
कितींनी यश  सहज गाठले....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देऊन गेले शिकवण.....
आपले सोबत असले की....
अशक्य नसते काहीपण.....

आयुष्यातिल पुस्तकातील धडे....
गोष्ट सांगत होते छानशी.....
करू नको तुलना बरं.....
कधी  ती  इतरांशी.....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
सांगत होते खरं.....
वेळेवर सोपवुन द्यायची....
काही प्रश्नांची उत्तर बरं.....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देऊन गेले जाणं.....
स्तुति असो की निंदा....
हरवु नको भान....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
गेली गुपीत सांगुन....
प्रत्येक समस्येत असते....
संधी ती लपुन....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देत होते कटु बोध....
सगळ्यात कठीण म्हणे आपल्या माणसांमध्ये....
आपली माणसांची शोध....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देत होते गतकाळाची जाणं....
झालेल्या चुकांमधुन शिकायचे....
सांगणे हेच यातुन मान....

आयुष्यातल्या पुस्तकातील....
गीरवता इतरांचे धडे.....
स्वतःचे धडे लीहायला.....
विसरायचे नाही हं गडे....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
वाचता हे रे कळले....
आयुष्याचे दुसरे नाव.....
तडजोड हे पडले....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
सांगत होते  कटुसत्य खरं...
प्रेमकहाणीचा शेवट.....
विरहानेच होतो बरं....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
असले कडवट जरी....
वेड्या सोडायची नाही....
वाट सत्याची खरी....

माझ्या आयुष्यातल्या....
पुस्तकातील धड्यात....
तूझ नाव लीहेन....
वेडू मी कोड्यात...

आयुष्यातील पुस्तकातील धडे....
इतरांचे वाचले तु कीती जरी....
तूझ्या दृष्टीकोनावरून ठरेल वेड्या...
तुझ्या जीवनाची वाट खरी...

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
रोज नवे नवे....
तरी कळेना माणसाला....
खरं काय हवे....

                          शाही..✍️✍️


20 December 2022

भरकटलेली आत्मा....चारोळी संग्रह

भरकटलेली आत्मा होती......
म्हणून तीने आत्महत्या केली.....
हुंडाबळीची केस अशी......
होती भरकटवुन दिली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वव्यापी तो
अविनाशी तत्व आहे
आत्मा आहे

ज्योत आहे ती
जाणिव नेणिव ती
हो चैतन्य ती

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरकटलेली आत्म्याची.....
सावली म्हणे तीच्यावर......
बलात्कार कीती झाली......
वशिकरणाच्या नावावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरकटलेली आत्मा म्हणत.....
त्या मनोरूग्णाचा छळ केला.....
अंधविश्वासाचा हा खेळ.....
कीती अज्ञांनिनी केला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भुत लागत तुला.....
नेहमीच तो ग म्हणतो.....
तीच्या रागराग करण्यालाही....
दोष तीचे कुठेना गणतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काम,क्रोध,लोभ.....
या शत्रूंमध्ये अडकली होती....
आत्मा मग ती.....
भरकटली होती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरकटलेली आत्मा......
अशिही दिसली.....
मोह मायात ......
होती ती फसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मसंयमी होऊन .....
सर्वशक्तिमान व्हावे......
भरकटलेली आत्मा ती.....
कोण तीला समजवावे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेदना सरली की.....
चेतनाही हरते......
भरकटलेली आत्मा.....
अशिही ठरते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माणुसकी हरवलेली......
जणु जीवंत प्रेत होती......
भरकटलेली आत्मा ती......
शरीर पांघरून फीरत होती.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जय पराजयाने.......
पश्चातापात विलीन होत होती......
भरकटलेली आत्मा अशी.......
हळुहळु लीन होत होती.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांसारीक लोभात.....
अडकलेली होती.......
भरकटलेली आत्मा.....
ती एक होती.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मा भरकटण्यासाठी.....
कारण ठरली होती.......
आत्माचे पतन म्हणजे.......
पाप ती घडली होती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कल्पना ही.......
आत्म्याचे जणु डोळे.......
तीलाच आज......
भरकटवायचे होते थोडे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मज्ञान हे......
सर्वश्रेष्ठ ज्ञान.......
भरकटलेल्या आत्म्याला.....
उशिरा आले हे भान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संपुर्ण विश्व जींकुनही.....
लाभ नाही त्याला.....
आत्माच ज्याचा.....
भरकटुन गेला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चिंता ती......
मांडून गेली खेळ......
भरकटवुन गेली आत्मा.....
साधुन वेळ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांतता आणी आनंद......
हवा असेल जीवनात.......
भरकटु द्यायच नाही आत्म्याला.......
गाठ बांध ही मनात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इच्छा नि महत्वाकांक्षांचे......
आवाज  ते वाढले होते......
आत्म्याला न समजुन घेता......
भरकटण्याचे खेळ मग झाले होते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेखक म्हणता अपरीहार्य.....
कल्पनेच्या जगात रमायचे......
पण अंधश्रध्दा वाढीस लागेल.....
असे विषय तुही ग टाळायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही✍️✍️....


19 December 2022

निर्भय....चारोळी संग्रह

निर्भय होते वेडु......
फक्त तुझ्या पुढे......
तुच तर वेड्या मज.....
जग माझे वाटे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुप्रथांवर मत.....
निर्भिडपणे ती मांडते......
निर्भय होऊन अशी......
लेखणीतुन ती सांडते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय रहाते......
घाबरत नाही कशाला......
पण आपल्यांना गमावण्याची भीती.....
असतेच  रे उशाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हायकु....(5-7-5अक्षर संख्या)

निर्भय राहु
सांग कशी घरात
अरे गर्भात

निर्भय राहु
स्वप्न जगात कारे
छळत नारे

निर्भय राहु
बोलता की हसात
कुणी नसता

निर्भय राहु
आवडेल ना तुला
प्रश्नच मला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जे करायला .....
वाटते ना भीती.....
निर्भय होण्यासाठी....
ते कर आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीथे तुझी .....
नाही ग चुक....
निर्भय तु.....
तिथे रहा बघ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गाव,अंगण....
बाजार गल्ली.....
निर्भय होऊन सांग ना....
जाऊ कुठे  रे हल्ली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय असेल....
तुला व्हायचे.....
सत्याचे मार्ग....
नेहमी  तु घ्यायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भितीच्या आड.....
नको गं लपायला....
निर्भय होऊन ......
हवे हक्क तु मागायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन......
कसं ते जगाव......
भारतीय जवानाकडुन......
खर रे तु शिकावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होण्याच......
खुप असत मनात.......
पण तुला गमवण्याची भीती.....
छळते क्षणा क्षणात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन......
जेव्हा ती व्यक्त होते......
समजुन घेण्याऐवजी......
संस्कारावर प्रश्न फक्त होते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन.....
आहेच रे जगायच.......
गर्भात कळी खुडल्यावर....
न्याय कुठे पण मागायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 अस निर्भय होण तुझ......
मला नाही कळल......
गमवुन कुणाला तुझ......
मनही  जरा नाही छळल......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वास ज्याच्या.....
असतो मनात.....
निर्भय होतो......
तो रे जीवनात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय तोच.....
असतो बरं.....
निर्भय होऊन.....
घेतो जो खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदी असेल....
तुला  जर रहायचं.....
तर निर्भय.....
  तु  मग व्हायचं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होण्याच.....
गुपीत ग छान.....
तूच तूझ बळ......
आधी हे जाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शिक्षण माणसाला.....
निर्भय  रे बनविते......
सुंदर आकार जीवनाला देऊन.....
स्वाभिमानाने जगवीते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन.....
ध्येय तु ग गाठ......
सोडू नको कधी.....
परीश्रमाची बर पाठ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय असते रे.....
तु आसपास असतांना.....
आत्मविश्वास वाढतो.....
तु सोबत असतांना......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही✍️✍️....


18 December 2022

चांदण्या रात्री--चारोळी संग्रह

चांदण्या रात्री.....
त्याची ग तु व्हावी......
ज्याला तु.....
अबोलही ना कळावी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
सोबती ग सखा खास.....
त्याच्या पुढे फिके.......
चंद्र नी चांदण्याची रास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
मनाने तु हसावी......
दुःख सारी.....
अशी ग ओसरावी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
वार्यावर डोलतात ती फुल पान.....
तुझ्या बटांमध्ये अलगद...
गुंतत जातं ग मग मन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्रीचा.....

  आठवतो नौका विहार......

जाणवतो  रे आजही.....

तुझ्या बाहुपाशाचा तो हार......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्रीचे ते स्वप्न......
सारेच आता विसरुन जा......
होती मी कधी तुझी.......
हक्क सारे हे विसरून जा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चंद्रकोरावर हळुवार.....
झुलवतो चल  ग तुझ झुला....
चांदण्या रात्री नको ना.....
वेडे जीवघेणा हा अबोला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शुक्राची चांदणी......
चंद्रकोराला बिलगुन बसते.....
अशीच रे छबी तुझी......
माझ्या वेड्या मनात असते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काजव्यांशी नको......
तोडू बर रे मैत्री.......
चांदण्या रात्रीची.......
नसते तशी खात्री......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....

ते निसर्गाच्या जवळ येणं.....

जणु विरहा नंतर......

तुझ ते मिठी घेणं ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या नि चंद्र......
बघ रात्री नभात.......
जणु सखा ग गुंग......
मीत्रांसवे गप्पांच्या मैफीलीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदणी रात्र.......
पांघरली ग त्या निसर्गाने....
जशी भेटताय चोरून.....
दोन अवखळ ती  मने.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......

परीमळ तो फुलांचा.......

जणु तारे सांडताय रे.....


सडा इत्राचा.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
आठवतं तुझ ते गुणगुणन.......
गोड त्या सादेत आवडलं होत.....
तु माझाच हे रे म्हणणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
तारा एक तुटावा.....
मागेन पुन्हा त्याला.....
जग जो माझा मज गं वाटावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री सांगीतले......
कीस्से आपले तार्यांना......
लुकलुकणं त्यांच सांगे जाणु......
आनंद होतोय ऐकुन ते सार्यांना.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री........
कीती दुखत रे मन.......
जेव्हा लुकलूकतात तुझ्या......
आठवणींचे सारे क्षण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या शिवाय नाही कुणी....
बघ ना येऊन ह्दयाच तळ....
चांदण्या रात्रीच्या या.....
अबोल चांदण्यांची तुझरे गळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडणार नाही साथ म्हणत......
दिली होती तु खात्री........
चांदण्याची ती वरात........
नी आठवतात त्या रे चांदण्या रात्री........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदणी रात्र.....
नी हाती तुझ्या हात....
ह्दयातुन ती.....
आठवण नाही जात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
आजही बघते......
नभातील शशीत....
भास तुझे जगते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
रातराणीचा सुवास.....
आजही भासतो.....
तु रे आसपास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
येशील का भेटायला....
आवडत आजही.....
वाट ती बघायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही✍️✍️....


17 December 2022

मेंदीचा रंग....चारोळी संग्रह

मेंदीही  बघना जणु......
गोड ती लाजली.......
तुझ नाव लीहीता.......
लाल रंगात भीजली.......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घेतोस का   रे तुही परीक्षा.....
सांग कधी प्रेमाची अशी माझ्या......
गिरवलीत का  रे कधी तु......
नाव माझी मेंदीत तुझ्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कीती लाजली  ती पाहुन.....
गहीरा रंग तो मेंदीचा.....
आठवला होता क्षण तीला तो.....
खोडकर त्याच्या प्रितीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या मनाचा मी गं मालक......
म्हणत मर्यादा तो गं हरला....
मेंदीचा रंग गडद तो.....
फोल होता मग ठरला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा......
प्रेमाचा प्रतीक कसा बरं.....
लवंग नि निलगिरीनेही.....
गडद होतो ना रंग खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ प्रेम नाही म्हणत....
कारे बर ते छळू तुला......
टेनिन रसायनामुळे गडद रंग.....
मेंदीचा लागल आता रे कळु मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा.....
जणु सांगत होता  हातावर.....
तूझेच नाव कोरले......
बघना वेडु ह्दयावर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा......
प्रतिक रे आनंदाचे......
समर्पण नी स्नेहाचे रंग.....
सासरी ते उधळण्याचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंहदीचा रंग गहीरा नसला की.....
प्रेम नाही ना तुझ म्हणत असते......
तीच्या या निरागस रुसण्याने....
मन ती वेडी मोहुन बसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा.....

चढला रे असा......

तुझ्या प्रेमाचा रंग......

जणु श्वासा श्वासात जसा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गालावरची ती लाली......
सांगत होती  ग गुपीत......
मेंदीच्या गडद रंगात......
होती तु नाव कुणाच लपवीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समर्पणाशिवाय रंग नाही......
सांगुन होते गेले......
गहीरे रंग मेंहदीचे......
हातावर जे आले.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा......
अपरीहार्य रे फीका पडणं.....
नात्यातुन नको पण.....
समर्पणाचा रंग तो हरणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

करतो गं तो वेडा......
प्रेम हरवुन भान......
मेंदीचा रंग गहिरा.......
दाखवत होतं हे छान.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक नात्यात तुही.......
समर्पणाने ग रंगायचे.....
नववधुच्या मेंदीच्या गहीर्या रंगात....
अर्थ हे ही का रे दडायचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हातावर मेंदीचा.....
रंग गहीरा लाल.......
जणु सांगतय तुझं.......
प्रेम कीती बेमीसाल......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदिचा रंग गहिरा.....
प्रतिक आपल्या प्रेमाचा.....
जणु सांगतोय चढला आता.....
रंग आपल्याला एकमेकांचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः  नाहीसी होऊन.......
रंग आनंदाचे ठेऊन गेली......
मेंदीची पान ही गं......
भास  स्त्रिचे देऊन गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नविन नात्यांचे रंग.......
जीवनात होते आले.......
मेंदीचे रंग गहीरे......
सांगुन होते गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या नावाच्या मेंदिला.....
गहिरा आला रे रंग......
जणु सांगत होता चलशिल....
आजन्म तु संग....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदिचा गहिरा रंग.....
आला होता रे हाती.....
तरी का नाही रे.....
जुळली सांगना आपली नाती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही✍️✍️....


चारोळी संग्रळ....

क्रिमिनल ना
धर्म की जात बर
विकृती खरं

क्रिमिनल ना
परीस्थिती असते
हो ती फसते
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रतिशोध घेण्याची.....
मानसिकता रे वाढली.....
क्रिमिनल केसमागची.....
कारण हीच कळली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन वेळच्या जेवणासाठी....
तो बाल अपराधी झाला होता....
क्रिमीनल केस समाजावर लादण्याचा....
विचार मनात मग आला होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समाजात गुन्हेगाराला.....
पाठींबाच जणु दिला जातो.....
गुन्हा मोठा घडला तरी.....
दोष तीच्या कपड्यांवर लादला जातो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोवर अपराधी.....
निर्दोष होऊन सुटतील.....
क्रिमीनल केस समाजातील....
सांग कशा बर थांबतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्राइम पट्रोल पाहुन...
अशी ती वागते.....
सगळ्यांना आता....
संशयी नजरेने बघते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वासाने विश्वासाचा.....
गळा तो कापला जातो.....
क्रिमिनल केस मध्ये.....
हा गुन्हा   का रे मानला  जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दगड जपण्यात......
फुल ती कुस्करली गेली.....
क्रिमिनल केस ही.....
कुठे न नोंदली गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस नाही....
पण आरसाच छळुन जातो....
नकळत गुन्हा कधी.....
असाही घडुन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन आजही.....
जमानत तुझी देते.....
निश्चित येशिल तु फीरून....
वाट रे मी पहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कबुल नाही केला त्याने....
प्रेम केल्याचा गुन्हा.....
त्याच्या डोळ्यांनिच दिली......
ग्वाही त्याच्या विरूध्द पुन्हा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस करता येते.....
धमकी देणार्यांवर.....
पण हक्क आहे त्यांचा म्हणत.....
नाही घेत ती मनावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमीनल केसचा तो गुन्हा.....
आजन्माचा  दाग. झाला....
कोर्टाने निर्दोष साबित करूनही.....
जगाने माफ नाही केला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती क्रिमिनल केस.....
घडताय समाजात.....
का नाही उरलाय......
कायद्याचा धाक मनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वासनांध नजरेने.....
जणु बलात्कार तीचा होतो.....
क्रिमिनल केस मध्ये सांग ना....
हा गुन्हाही ना येतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शाब्दीक मार.....
जे मारून गेले......
क्रिमीनल केस मधुन.....
का त्यांना गाळून दिले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चोरी करणार्यांवर......
क्रिमिनल केस ना गं होते......
झोप गं त्याने चोरली माझी.....
सांगना एफ. आय. आर.कुठे दाखल होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुन करणार्यांवर......
क्रिमिनल केस ना दाखल होते.....
कीती भावनांचा खुन होतो.....
पण केस  दाखल कुठे रे ती होते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनानेच माझ्यावर.....
क्रिमीनल केस रे फाईल केली....
मी खुपदा म्हणे त्याला.....
मरण यातना दिली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस.....
कुणाविरूध्द लढायची.....
आपलेच दात नि.....
आपलेच ओठ असायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस.....
ती ही का होईल.....
भावनांना जेव्हा....
कुणी छळून जाईल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडु तु जणु....

भविष्याची आरोळी.....

तूझ्यासाठी गुंफली....

बघ सुंदर रे चारोळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही✍️✍️....


16 December 2022

चारोळी संग्रह....

मनासारखी अनाकलनिय.....
गोष्ट नाही कुठली......
क्षणात नभात क्षणात धरेवर.....
खेळ ही त्याची नाही समजलीत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कीती वास्तुशिल्प.....
अनाकलनिय आहेत.....
प्रगत शास्त्रापुढेही....
गुढ ती राहेत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय गोष्ट......
चराचरात दडली......
तेव्हाच तर परमात्म्याची.....
महती ती कळली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय गोष्ट.....
ती ही असते.....
माझे मन अबोल.....
कसे तुला समजते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळ कपट

हो तो  रे धुर्तपणा

छळतो मना


छळ कपट

राजनितीचा खेळ

स्वार्थाचा मेळ


छळ कपट

नात्यात रे नसावे

घाव दिसावे

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सत्य हे नश्वर......
असावे ध्यानी......
छळ कपट मग......
शिरत नाही मनी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमात तुला.....
असेल रे सगळ माफ....
छळ कपटाच पण....
नको त्यात बरं पाप...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुणाच्या छळ कपटाची ....
नाही वाटत भीती.....
तू जेव्हा पासुन......
आहे ना वेडु संगती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळ कपट म्हणता....
आजही आठवली......
पाठीमागची निंदा......
संस्कार तुझे दाखवली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अती निरागसताही.....
घातक तीची ठरली....
छळ कपटाच्या दुनियादारीत.....
वेडी ती हरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हसुन जे.....
छळ करतात.....
कसे लढावे त्यांच्याशी.....
प्रश्न पडतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री म्हणजे.....
खाण छळ कपटाची......
कधी बदलणार......
मानसिकता ही समाजाची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोबत राहुनही.....
मनात छळ कपट.....
याहुन मोठा शत्रू.....
दुसरा नाहीरे वाटत......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्या कर्मावर....
आत्मविश्वास रे ज्याला.....
छळ कपटाशि.....
घेण देण नाही त्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खूळा नाही गं.....
दंव्दात होता पडला......
आपल्यांच्या छळ कपटांनी.....
होता भान हरला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळ कपटाची.....
नको जुगलबंदी.....
विसरतो कसं.....
मी तुझ्या मनामंधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पंचपक्कव्वान भेटतील.....
छळ कपटाच्या चाकरीत.....
पण समाधान भेटेल.....
कष्टाच्या भाकरीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळ कपट करून.....
क्षणात अपेक्षा होतीलही पुर्ण....
पण कष्टाचच पुरत बरं.....
आयुष्याला संपुर्ण......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळ कपट नसते......
लहान मुलांच्या जगात......
आनंद नी समाधान......
म्हणुन त्यांच्या जीवनात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःच्या आयुष्याची.....
त्याने फरफट केली......
निर्मळ मनाशी कुणाच्या.....
ज्याने छळ कपट केली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तेच करतात......
छळ कपट......
बराबरी करून.......
जे जींकु नाही शकत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही✍️✍️....


विषय-- अनाकलनिय गोष्ट....चारोळी संग्रह

अनाकलनिय  आहे वागणं तुझ.....
पण आवडतं मला  रे खुप.....
कधी म्हणतो नको गं अबोला....
कधी म्हणतो बस ना चुप.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरच अनाकलनिय गोष्ट का रे.....
स्वतःला ते समजुन घेणं.....
चुकीचीच ना मग ती अपेक्षा......
दुसर्यांना आपण उमजून येण......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय गोष्ट जणु......
आईगं तुझ मन.......
न सांगताही कस कळत......
सांगना तुला सगळ पण......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय गोष्ट झाली.....
सोशल मिडीयाचं हे रे जग......
माणुसकीवर भरभरून बोलणं.....
पण माणुसच हरवला ना बघ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अनाकलनिय गोष्ट नाही रे......
समजुन घेणे ते कुणाला......
त्याच्याजागी एक क्षण......
ठेऊन पहाव की स्वतःला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय होते रे......
कधी हे शब्दांचे जग......
भाव बदलता मनाचे.....
अर्थ ही बदलता कसे बघ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय गोष्ट म्हणत.....

चुक आजही रे कळली......

न सांगता समजुन घे म्हणत.....

कीतीदा उगाच  मी न लढली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



अनाकलनिय गोष्टीची.....
लागते ओढ  तेव्हा जास्त......
शास्त्र म्हणते प्रत्येक घटनेमागे.....
कारण असत म्हणे  रास्त.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांच जगही.....
अनाकलनिय कीती.....
कधी अर्थ गोड......
कधी अनामिक भीती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय ओढ.....
का रे तुझी वाटते......
सांग ना वेड्या.....
कोण मी तुझी लागते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय प्रेम पत्र......
तुझे आजही जपलेले......
कुणासाठी ते कोरे पान......
पण मन मज रे कळलेले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय असतो.....
नियतिचा ही खेळ ......
न भेटणार्यांशी गुंतवुन जाते......
नेहमी मनाचा मेळ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रेमाची भावनाही........
अनाकलनिय कीती.......
नकाराच्या भीतीने........
अव्यक्त रहाणे अती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

करमत नाही म्हणतो.......
नि वेळ ही नाही भेटायला.....
वागण तुझ लागल......
अनाकलनिय रे वाटायला.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय होतात.....
शब्दफुले तुझी.....
भास आभासांचे खेळ....
की भ्रम कळेना माझी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्रि मन म्हणे.....
अनाकलनिय कीती.....
का रे समजुन न घेण्याची.....
वाटते तुझी ही निती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय होतात....
कधी कधी रे संवाद.....
उगाच वाढतात मग.....
गैरसमजातून वाद.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मानवि स्वभावही.....
अनाकलनिय कीती.....
समजल म्हणता.....
गृहीत धरण्याची भिती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनाकलनिय वाटते.....
जीवन ही का रे.....
व्यक्तिसापेक्ष असते.....
सुख दुःख नारे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही✍️✍️...


विषय-- इतिहास...चारोळी संग्रह

तुला रडायचा हक्क नाही......
असा इतिहास नको वाचु.......
तुझ्याही मनाचा हळवा एक कोपरा......
नको असं आतल्या आत साचु......

तुलाही आहेत भावना.......
जाण याची असायला हवी......
कोण म्हणत शौर्यवान पुरूषाची.......
पापणी ती भीजायला नव्ही.......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रे अपेक्षा इतिहास म्हणता तु.....
प्रेमात ताजमहाल बांधण्याची......
आहेरे वेड्या इवलीसी अपेक्षा.....
भावना माझ्या त्या समजुन घेण्याची....

इतिहास प्रेमाचा......
ताजमहाल ही रे सांगतो.....
जीवंतपणी जपा एकमेकांना....
जणु खुणगाठ ही बांधतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या प्रेमाच्या इतिहासात.....
नाव  माझ तु जपावं.....
आजही हेच स्वप्न......
वेड्या मनी रे लपावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकदा घेतला निर्णय.......
की मागे नाही फीरायचं......
असेल जर जीवनात.......
इतिहास तुला रचायचं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भुतकाळाच्या प्रकाशात......
वर्तमान समजुन घेणे......
इतिहासाचा हेतु......
हा ही बर होणे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रचलित गैरसमज......
संपुष्टात येतात.......
इतिहासाच ज्ञान......
यासाठी माध्यम होतात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन.....
इतिहासाची पुनर्रचना व्हावी.....
स्त्रिवादी इतिहासाची.....
हीच ना संकल्पना रहावी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कल्पनाशक्ति,तर्कशक्ति नि.....
निर्णयशक्ती  वाढावी.....
इतिहास शिकण्यातुन.......
प्रेरणा हीच ना मिळावी.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाल्याचा वाल्मिकी.....

झाला ना जेव्हा......

चांगल्या संगतीत बदलतो.....


कळले इतिहास तेव्हा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाचा इतिहास.....
सांगुन रे गेला......
खर्या प्रेमाला अपुर्णत्वाचा......
शाप राहुन गेला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


रचला असता इतिहास.....
तुझ्या माझ्या  रे प्रेमाचा......
अव्यक्त राहुन ठेवला तु......
कोराच  पान तो जीवनाचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कठीण काळात......
लढला जो धीराने......
इतिहास घडवला.....
त्याच विराने......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


इतिहास आहे तो.....
महान व्यक्तिंची जीवन गाथा.....
शिक बरं त्यातुन.....
नको वाचु फक्त समजुन कथा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही✍️✍️....


22 August 2022

विषय=मजेदार गोष्टी....चारोळी संग्रह

मजेदार गोष्टीत.....
तूझ रुसणं ही गं जपलेलं.....
डोळ्यात  तूझ्या दिसायचं....
खोडकर हसू  ते लपलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टीतं.....
पहील्या भेटीचे रे ते किस्से.....
गोड आठवणिंचे.....
न तुटणारे ते हिस्से....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किचनमध्ये नविन पदार्थ.....
खुपदा ना फसतो......
मजेदार गोष्टीत तो......
मग सगळ्यांच्याच असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट.....
ती ही आठवून गेली....
होमवर्क नाही केला की....
वही घरीच विसरुन दिली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट.....

तीही ना छान असते....

ट्रकवरची शायरीही.....

गोड ती हसवत असते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खोकला ऐकताच.....

सगळे दुर पळायचे......

करोनाकाळत असेही.....

मजेशिर किस्से घडायचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टींसाठी....
नाही कुणा सवड.....
बदलत चालली.....
प्रत्येकाची आवड.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट.....
जेव्हाही घडली......
हसू नका जोरात....
तंबी ही पडली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट.....
तेव्हाही घडते......
न बोलताही मन.....
जेव्हा त्याला कळते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट....
प्रत्येकाच हसु.....
अनोळखीही लागतो....
आपलाच दिसु.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही बोलणार म्हणत....
किती ती बडबड करते.....
मजेदार गोष्ट ही तीची.....
नेहमीच मन हरते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट......
उद्या होती घडणार....
त्याची माझी भेट.....
होती गं ठरणार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझी बडबड वेडू.....
मजेदारच गोष्ट.....
हरवते  गं ती....
दिवसभराचे माझे कष्ट...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टीत....
निरागसता छान....
सहज हरवते.....
म्हणून ती भान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू शब्द शोधत बसला.....
मी डोळ्यांनीच गं बोलून गेली....
मजेदार गोष्ट प्रेमात अशी....
कीतीदा गं घडून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टी.......
जपलेल्या मनात.......
हसुआणतात.......
चेहर्यावर क्षणात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टी.....
खर ना त्या असतात.....
आपल्या चुकांवरही.....
आई बाबा जेव्हा हसतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निरागसपणात लपली.....
मजेदार गोष्टीची गंम्मत.....
हरवून बसलो की......
देऊन मोठेपणाची किंमत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट.....

मोबाईलची  गं छान.....

बडबड माझी ऐकता....

हरवतो वेळेच तो भान......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट....
आहे गं अशी.....
आवडतो बर.....
नभातील शशी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याची सगळ्यात....
मजेदार गोष्ट.....
बालपण दिसत.....
त्यात स्पष्ट.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  मजेदार गोष्टी......
आठवतात का रे आजीच्या.....
आजही बंद त्या.....
कप्यात मनाच्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्रिच वय न विचारण्यामागे.....
आहे मजेदार गोष्ट.....
ती स्वतःसाठी कुठे.....
जगते हो जास्त......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


मजेदार गोप्टी.....
आजीच्या भारी......
बोधपर कथेतून.....
शिकवायची दुनियादारी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट.....
अशी कळली....
ती वेडी म्हणे....
प्रेमात पडली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टी.....
रंगवते ती छान.....
खर खोट्याची.....
विसरता जाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार असतात......
त्याच्या गोष्टी फार....
दडलेले असतात त्यात.....
जीवनाचे सार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्ट म्हणत....
गुपीतही कुणाची सांगीतली जातात....
खर ना मजेदार गोष्टीचे.....
सोयीचे अर्थ येतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टीत.....
दोष दुसर्याचे दिसतात का?!.....
गोष्टी सारखेच लोक.....
त्यावर मग हसतात का?!.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मजेदार गोष्टीत.....
निंदाही का मोडते.....
काहींना मात्र.....
गोष्ट ही फार आवडते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


13 August 2022

विषय-पैज....चारोळी संग्रह

जगण्याची रोज .....
पैज ती सकाळी.....
अनुभवांची शिदोरी.....
गावते मग संध्याकाळी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी मी साद द्यावी....
पैज ही रे का यावी.....
कधी तरी ओढीने....
तुही ना भेट घ्यावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नात्यांमध्ये पैजेचं.....
आहे एक तंत्र....
असावा त्यात खोडकरपणा......
नको ते शडयंत्र.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रवास हा दोघांचा.....
मग का रे पैज अशी....
नेहमीच मी पुढाकार.....
सांग बर घेऊ कशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमात कुठे.....
पैज ती लावली जाते.....
प्रेम कसे म ते....
व्यवहार ते गणले जाते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटीला येतांना.....

पैज ही रे लावायची......

दोघांनिही आपली.....

घड्याळ नाही हं आणायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चल प्रेमाची लावू.....
पैज पुन्हा......
पण धोखा देण्याचा....
यावेळी मी करेल बर गुन्हा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ मन जींकण्याची.....
उगाच पैज लावत बसली.....
माझं मन बघना.....
तुझ्यात हरवुन रे बसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स़्तःशीच एक पैज......
अशी मी रे हरून जाते.......
तुला विसरायचं जेव्हा......
 ही मी ठरवुन जाते.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याची दूःख हरवुन.....
सुख आहे गं जींकायची.....
नियती ही पैज....
मला नाही गं हरायची...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निराशा जेव्हा जेव्हा......
येते ना जीवनातं....
स्वतःशीच पैज लावुन....
जींकायच ठरवा मनातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संयम हा नेहमी......
 पैजेत गरजेचा बरं......
कासव नि सस्याच्या शर्यतीत....
कासवच जींकतो खरं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जर तर चा हा खेळ......
व्यसन ही बनतं.....
वेळीच  आवर घालावी....
नाहीतर जगणच हरतं ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैज लावली असती.....
पण नाही रे जींकायचं......
हरून तुला जिंकण्याच सुख.....
तुला नाही उमजायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैज न लावता.......
एक तूला सांगु का......
तुझ्याशी हरण्यात.......
जींकण्याच रे सुख का........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही...✍️✍️


11 August 2022

अनोखी प्रेम कहाणी

त्याग नि समर्पणाचे.....
बंध जीथे बांधले गेले......
अनोख्या प्रेम कहाणीतं.....
सगळे ते गणले गेले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी होईल तेव्हा.....
जेव्हा परीभाषा प्रेमाची समजेलं.....
इथे तर सगळे वासनेचे पुजारी......
खर प्रेम कसं ते उमजेलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचा होता खेळ.......
ती प्रेमात पडली होती.......
कहाणी अनोखी अशी वाचता......
वेडी ती रडली होती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम ही कधी कधी.....  
असहाय करून रे जातं......
दिसत सगळ चुकतंय......
तरी मन रे गुंतत जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठरवुन कुठे.....
प्रेमकहाणी घडते.....
नशिबात नसलेल्याच्या मागेच....
वेड मन हे पळते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी प्रेमकहाणी......

तुझी माझी किती......

तुला गमावण्याची का रे.....

वेड्या मनी भिती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर्या प्रेम कहाणीला.....

अपुर्णत्वाचा रे शाप.......
का नाही करत नियती.....
यांना कधी रे माफ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या ह्दयात वेड्या......
स्पंदन माझी बरं.........
स्वतःला जप नाहीतर......
माझ नाही हं काही खरं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी असुनही......

आपल्यात ते गणणं होतं.....

यालाच का सांग ना......

प्रेम ते म्हणणं होतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शहाजहान मुमताजची.....
अनोखी होती प्रेम कहाणी......
ताजमहाल आहे म्हणतात.....
त्याचिच निशाणि......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती प्रेम तूझ्यावर......
शब्दात कस रे मांडणार......
पण, तुझ्यासाठी तूझ्याशिच....
आजन्म मी भांडणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला गमवण्याच्या भीतीने....
तुझ्याशीच  रूसणं असतं...
वेड्या मनाच कसं.....
तूझ्यात हे गुंतणं असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु क्षणभर रूसला तरी....
श्वास माझा रे गुदमरतो.....
सांग ना कुठली जादू....
मन तुझ्यातच रे हरतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी.....
प्रत्येकाची असते.....
कधी व्यक्त तर......
कधी अव्यक्तच असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लव स्टोरी ती......
होती म्हणे खास.....

इभ्रतीसाठी दोघांनी.....
गिळला विरहाचा फास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटणार नाही दोघं......
दुनियादारी जाणुन होते.....
तरीही एकमेकांना....
आपलं ते मानुन होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लव स्टोरी ही.....
अनोखीच असते...
पुर्णत्वाची तीची.....
शाश्वती ती नसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखीच आहे..
आपली प्रेम कहाणी....
दूःख माझे पहाता.....
डोळ्यात तूझ्या  पाणी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी....
होती दोघांची.....
अव्यक्त असता ही....
कळली प्रित एकमेकांची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी.....
आहे ना रे आपली.....
न भेटता मन आपण....
आहे ना जपली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


10 August 2022

विषय--पैसा बोलतो....चारोळी संग्रह

कष्ट करता......
पैसा येईल रे गाठी......
बघ कसे असतील.....
मग सगळे तुझ्या पाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैसा गरज.....
नाही रे सर्व....
का असावा....
फुकाचा हा गर्व......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीथे चालली......
पैश्याची भाषा.....
माणुसकीची तीथे......
पुसटशीही नाही आशा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैशाने माहीत नाही......
काय लावालावी केली.....
सख्खे भाऊ पहाना.....
जन्माचे वैरी झाली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैश्यांच्या बोलण्याची.....
जादू अशि पाहिली.....

दुर गेलेली नातिही....
जवळ येऊन राहिली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैसा कितीही.....

बोलूदे बर......

समाधान पैशात......

नाही तोलता येत खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्रिमंताच्या आत्महत्येत...

असेल ना काही तथ्य....

पैसा बोलतो हे....

आहे का रे अर्धसत्य....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैशाच ते बोलणं.....
खुप बरं आवडुन गेले.....
दान देऊन कितींच दूःख.....
होत त्याने सावरून नेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेइमानिचं धन......
होतं त्याला जपायचं.......
ईमानदार चौकीदाराशिवाय.....
नाही म्हणे जमायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेइमानिचं धन......
होतं त्याला जपायचं.......
ईमानदार चौकीदाराशिवाय.....
नाही म्हणे जमायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैशाची गरज म्हणता.....
शिल तिने विकले.....
पैसा किती बोलतो....
होते मग उमगले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गरज आणि लोभ.....
यातील अंतर सरले.....
पैश्याच बोलण....
अपरीहार्य ठरले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैसा आणि कपडे.....

बोलतात खोट बरं.....

खरी ओळख माणसाची.....

वेळच दाखवते खरं.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैसा बोलतो.....

वाचव बरं मला.....

मी ही मग.....

वाचवेल तुला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सत्य आणि माणुसकी....
असते जीथे....
पैश्याची बोलती...
बंद होते तिथे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैसा बोलतो.....
पण थांबतो कुठे.....
कदर वेळी नाही केली तर....
पळवतो मागे पुढे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैसा बोलतो.....
सगळेच म्हणतात.....
पण दूंःखात मात्र.....
आपल्यांना शोधतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही...✍️✍️

                  


09 August 2022

विषय--दूर गेलेले मित्र......चारोळी संग्रह

मित्र दुर गेले.....
पण आठवणीत असतातं....
कधी येतो सांगावा....
की तुझ गं ते पुसतातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्रि म्हणता माहेर सोडणं..... 
अपरीहार्य तीला.....
सखींचा गोतावळा दूर होता......
आठवणीत जपण भाग तीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येकाची स्वप्न वेगळी.....
वाटाही रेवेगळ्या झाल्या.....
आठवणी त्या मैत्रीच्या.....
मनात दडून राहील्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही मित्रांना नियतीने.....
नेलं खुप रे दूर......
आठवणित त्यांच्या.....
डोळ्यांना येतो पुर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुर गेले मित्र.....
आठवणि ठेवुन.....
किती ते आठवतात....
राहुन राहुन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमजांनी काहीं मीत्र....
गेले निघुन दूर.....
आठवण येता उगाच मनी....
होते हुरहूर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पोटापाण्यासाठी काही मीत्र....
दूर निघून गेले....
आठवांचा पसारा....
भेट देऊन रे गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दूर गेलेल्या मित्रांच......
आहे मनातं रहाणं......
स्वप्नापाठी झालं त्यांचं.....
दूर निघुन जाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जगरहाटीत मित्र सगळे....
वेळ नाही  म्हणतातं....
आठवांच्या मैफीलीतच.....
सगळे ते जमतातं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दूर जाण्याचं सख्या.....
नाही दूःख तूझ्या.....
आठवण गोड होऊन....
सोबती रहाशी माझ्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणि तूझ्या बघ सख्या....
जातिल  बरं सरून....
नव्या आठवणि देण्यासाठी....
येना लव कर  परतून.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणिंची शाळा....
भरते  मनात....
दूर गेलेले मित्र....
आठवता क्षणात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भातुकलीचा खेळ.....
मांडलेला पाहीला......
बालमैत्रिणिंचा गोतावळा....
डोळ्यात दाटुन राहीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काँलेजच्या दिवसाचे....
क्षण ते साठवलेले.....
भरारी घेण्यासाठी दुरावले  जे मित्र....
होते आज सगळे रे आठवले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूला आठवण्याचा सख्या..
घडतो रे गुन्हा.....
दूर जाउनही सांग ना......
का आठवतो तू पून्हा पून्हा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वास इतका की.....
पारखुन नाही पाहीले.....
दूर गेला सख्या तरी....
आठवणित जपून राहीले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बदलून गेलेले मित्र.....
आठवणित रे  रहातात......
दूर गेलेल्यांची मात्र...
डोळे आजही रे वाट पहातात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बदल हा नियम वेडू......
आहे गं सृष्टीचा......
मि बदलता का गं......
गाजावाजा या गोष्टीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही....✍️✍️

     

       


08 August 2022

विषय--बालपणिचे मित्र....चारोळी संग्रह

परीकथा ऐकता  ऐकता.....
बालपणी झोप लागायची.....
आता या आठवणित.....
रात सारी जागायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळ ही बघ ना.......
कसा व्यवहार करून गेला.....
तारूण्य देऊन हाती.....
बालपण घेऊन गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वडाच्या पारंब्याचे झोके.....
आठवुन गेले...
बालमित्राचे डोळेही...
मग दाटुन गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपण पुन्हा.....
परतुन ते आले.....
बालपणिच्या मित्राला....
भेटणे जेव्हा झाले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शाळेची ती घंटा.....
पहीले पळण्याची ओढ.....
आठवण आजही...
आहे किती ती गोड...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन बोट जोडता....
मैत्री पुन्हा व्हायची....
आता ही निरागसता....
कुठे ती यायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीचा मीत्र येतांना...
बोर चींच घेऊन रे आला.....
वाटून ते खाता मात्र....
समाधान तो बालपणीचा होता हरवला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सख्यांसोबतची ती गंम्मत...

कागदाची ती होडी.....

बालपणिच्या त्या पाऊसाची....

वेगळीच होती रे गोडी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीचा मित्र नि मैत्री....

जिव्हाळ्याची रे खात्री....

प्रेम निरपेक्ष निखळ.....

आनंदचं ते रे आगळ.... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणिच्या मित्रा सांगना.....
आठवते का कट्टी बट्टी.....
निरागस पणा हरवता.....
का होतात सगळे रे हट्टी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तहान एकाला लागायची.....
नी सगळ्यांनी ते जायचं ....
बालपणीच्या  मीत्रा सांग ना....
असं का पुन्हा जगता यायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लीमलेटची एक गोळी......
वाटुन कशी सगळे खायचो....
कुठ हरवल ते समाधान...
सांग ना  आता का नाही रे तस जमायचं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणिचा मीत्र....
आताच गं भेटला....
किती बदलली म्हणता....
हक्काने होता भांडला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणाचे मीत्र...
दुनियादारीत गमले....
वेळ नाही म्हणत.......
सगळे संसारात रमले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


07 August 2022

विषय--आयुष्यभराची मैत्री....चारोळी संग्रह

गैरसमजांना जीथे......
कणभर जागा नसते......
आयुष्यभराची मैत्री.....
मनभर तिथे असते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

न मागताही चुकीला......

माफी जीथे दिली जाते.....

आयुष्यभराची मैत्री.....

तीथेच जपुन रहाते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहे तसच.....
जीथे स्विकारलं जातं.....
तेच  तर आहे .....
आयुष्यभराच्या मैत्रीच नातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्यभराच्या मैत्रीचा....
आहे रे सार.....
अपेक्षांचा त्यात....
नसावा भार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोकळीक बोलण्याची....
असते ना जीथे....
आयुष्यभराच्या मैत्रीची...
खात्री मग तीथे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या वेड्याने मनात.....
केली अशी गं जागा.....
जुळलाय त्याच्याशी....
आयुष्यभराच्या मैत्रीचा धागा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चारोळी म्हणजे....
कळली का तुला काय बरं...
शब्दा शब्दांची असते ती...
आयुष्यभराची मैत्री खरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सहवास क्षणाचा पण.....
ओढ कायमची असते....
आयुष्यभराच्या मैत्रीची....
अशी का रे परीभाषा असते?!....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकांतातही एकट....
वाटु देत नाही.....
आयुष्यभराची मैत्री अशी....
निराशेत हरू देत नाही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीची मैत्री......
होती रे आठवली.....
आयुष्यभराची मैत्री म्हणता.....
तिच तर ना साठवली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फाँलो अनफाँलोचा.....
खेळ आता रे पुरे झाला......
कळलं का वेड्या आता .....
आयुष्यभराच्या मैत्रीचा खेळ तो सुरू झाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्यभराची मैत्री....
असुदे आपली.....
तु आणी मी....
मनाने ती जपली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर कितीही.....
असुदे तरी......
तुटत नाही तिच....
आयुष्यभराची मैत्री खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमजांनी तुटत नाही.....
तीच तर मैत्री....
आयुष्यभराची असते....
तिची रे खात्री.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निरपेक्ष असते.....
तिच खरी मैत्री.....
आयुष्यभराची मग....
द्यावी लागत नाही खात्री...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडल असतं......
मैत्री आयुष्यभर तुझी जपायला....
पण तिची आणी त्याची मैत्री....
कठीण दुनियादारीत समजायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


06 August 2022

विषय--बेस्ट फ्रेंड.....चारोळी संग्रह

मैत्रीचं नातं....
शब्दात कसं बाधायचं.....
आपल्या सारख बंधनांच जग...
त्याला नाही चालायचं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझा बेस्ट फ्रेड..... 
आहे माझा आरसा....
फसवत नाही तो.....
कुणाला फारसा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरा मैत्रीचा अर्थ.....
अब्बांनी जगण्यातुन शिकवला....
माझा  अनमोल बेस्ट फ्रेंड....
नियतीने गं हिरावला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁.

माझा बेस्ट फ्रेड......
आहे गं माझी ताई.....
काळजी अशि घेते....
जणु गं माझी आई....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझा बेस्ट फ्रेड.....
होती माझी आई......
नियतीने दुर नेण्याची......
तिला केली गं घाई.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप भांडतो आम्ही आणि....
एकमेकांची काळजीही घेतो....
माझा बेस्ट फ्रेंड माझा भाऊ....
असा कधी माझा बाप ही होतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझा बेस्ट फ्रेड.....
सखा माझा खास....
सगळ्या नात्यांचे.....
त्यातच आता भास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीही......
बेस्टफ्रेंड माझा रे खास.....
रात्री जागतो माझ्या सवे....
मनी रुतता कधी रे फास...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हो गं माझी आई म्हणत.....
चुका माझ्या ती सावरून घेते....
आहे ती बेस्ट फ्रेंड अशी...
हट्ट सारे पुरवून देते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तुच बर.....
बेस्ट फ्रेंड माझा खरा.....
रागा लोभाच्या सगळ्या वाटा.....
वळतात तुझ्याकडे जास्तच जरा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुख दुःखात जी....
हक्काने होते रे वाटेकरी....
अशी माझी बेस्ट फ्रेंड.....
जपली मी  रे अंतरी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन मोकळं करण्याची.......
हक्काची ती  रे जागा.......
माझ्या बेस्ट फ्रेंडशी माझा......
जुळला ऋणानुबंधाचा असा धागा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणिच्या निरागस मैत्रीला...
नाहीच कसली रे तोड...
आजही त्यात आहे....
तीतकीच अनामिक ओढ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेस्ट फ्रेड माझे......
आहे रे तसे कमी......
पण खरे हितचिंतक ते......
याची देते हमी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांना काही हव असतं......
तुलाच रे कसं काही नको.....
बेस्ट फ्रेंड माझा म्हणतो वेडी.....
मैत्रीत कधीच व्यवहार नको.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझा बेस्ट फ्रेंड.......

आहे मनकवडा रे जरा......

हसर्या चेहर्यामागचा......

दुःख जाणतो तो खरा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचारांना माझ्या......

नवी दिशा देऊन गेला.....

पुस्तक ही असा माझा.....

बेस्ट फ्रेंड मग होऊन गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेखणी माझी आता....

बेस्ट फ्रेंड रे ठरली.....

व्यक्त होण्याची तीने.....

हमी आहे भरली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझी बेस्ट फ्रेंड....
मीच होते कधी.....
समजून स्वतःला घेणे.....
गरजेचे ना आधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ली पी सखी तुही माझी....
बेस्टफ्रेंड गं खास....
अस्तित्वाला दिली तु ओळख....
नि वाढवला गं  आत्मविश्वास...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


05 August 2022

विषय-- आठवणीतली गाणी

आठवणीतील त्या गाण्यांची....
ह्दयात वेगळी रे जागा.....
आपल्या सुख दुःखांचा....
अलगद जुळतो त्यांच्याशीना धागा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नव्या गाण्यातील ....
स्वँग आहे रे भारी....
पण आठवणीतील गाण्यांची....
मधुरताच न्यारी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रिमिक्स करता.....
धुन ही बदलून पाहिली.....
जुन ते सोन होतं.....
सल ही मग राहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणीतील ती गाणी.....
नी लोकरीचे गुंतून गेलेले गोळे....
स्वेटर नाही रे स्वप्न होती वीणलेली....
आठवता पाणवता आजही रे डोळे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज पुन्हा मन....
दाटुन आलयं......
आठवणीतल्या त्या गाण्यातुन....
तूला रे भेटुन आलय....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विरह वेदनेने भरलं होतं.....
आठवणीतील ते गाणं.....
उगाच आठवुन देतं तूझं.....
अर्ध्यातून ते सोडून जाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऐ मेरे वतन के लोगो.....
आजही गाणं हे रडवून जातं....
स्वातंत्र हे बहुमोल किती....
महती याची पटवुन जातं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनातील स्वप्न ही....
जेव्हा ही चुरचुर झाली......
आठवणीतील ती गाणी......
सावरायला मग धावुन आली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अर्थपुर्ण असायची...
गाणी ती जुनी....
अंताक्षरी खेळता आजही....
आठवतात तीच मनी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळे पाणवतात..
आणि ओठावर हसू होतं....
आठवणीतील त्या गाण्यात....
तूझ येणं असं होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वियोगी भुतकाळ.....
की अतुट रे स्नेहबंध.....
आठवणीतल्या त्या गाण्यात.....
भास तुझे मंद  मंद.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी जशी जशी.....
हळुहळु कळत गेली......
आठवणीतील त्या गाण्यांची.....
अर्थ मग वळत गेली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणीतली ती गाणी.....
ऐकते सख्या कधी कधी.....
जेव्हा डोळ्यात तुझ्या विरहाने....
येते आसवांची नदी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणीतली ती गाणी.....
गुणगुणली तु किती छान.....
सुर तुझे भिडले मनाला....
विसरले मी वेड्या भान......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणीतली ती गाणी.....
कधि पडतात कानी.....
आठवते मला मग वेड्या....
आपली प्रेम कहाणी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणीत गेली.....
किती ती गाणी बरं.....
सुर कानावर पडता आजही.....
क्षण ती जीवंत होतात सारी खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती अर्थपुर्ण होती....
आठवणीतली ती गाणी....
सांगतात सगळी ती.....
त्या युगाची कहाणी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


04 August 2022

विषय--मृतांची ट्रेन.....चारोळी संग्रह

मृतांच्या ट्रेनेतही सगळे.......
खीडकीतून पळती झाडे मोजत होते....
हरवलेलं बालपण तेही...
असं वाटतं शोधत होते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांच्या ट्रेनमधुन...

हाथ कुणी रे दिला.....

कुणी आपलं का म्हणता....

प्रश्न सल होऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या आठवांची ट्रेनही....
सुसाट रे पळते....
मलाच चेन ओढुन....
उतरणे भाग मग पडते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांच्या ट्रेनचा विषय......
कारे राजा काढायचा.....
भितीने तूझ्या मिठी शिरावे......
खोडकर भाव तुझा रे कळायचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांच्या ट्रेनमध्ये......
ती लेकर रडली होती.....
वृध्दाश्रमात आई बाबांना पाठवुन....
जी यशस्वी म्हणे जीवनात गणली होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांच्या ट्रेनमध्ये......

ती लेकर रडली होती.....

वृध्दाश्रमात आई बाबांना पाठवुन....

जी यशस्वी म्हणे जीवनात गणली होती.... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्लँनचिट खेळुन म्हणे.....
परत मी तूला घेउन येईन....
माझा वेडा कस गं मला.....
मृतांच्या ट्रेनमध्ये जाउ देईन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कल्पना असली तरीही.....
खरच जर अस झालं असत......
तर मृतांच्या ट्रेनमध्ये बसुन......
अम्मा अब्बांना भेटता आलं असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांची ट्रेन.....
आहे गुढ रहस्य बरं .....
दिसली ती खुपदा पण....
उलगडले नाही कारण खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांची ट्रेन.....
आहे गुढ रहस्य बरं .....
दिसली ती खुपदा पण....
उलगडले नाही कारण खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांची ट्रेन.......
ती कारे असावी......
बोगद्यातून ट्रेन जी......
गायब दिसावी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पोलिसांपासुन वाचण्यासाठी.....
ट्रेध मध्ये ते चढले.....
मृतांच्या ट्रेनचे किस्से.....
असे मग घडले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांच्या ट्रेनची.....
भीतीदायक कहाणी......
ऐकता डोळ्यात तूझ्या....
येईन बर पाणी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांची ट्रेन......
नाही रे दंतकथा.......
जीवंत लोक ट्रेनसोबत......
गायब झाल्याची ती व्यथा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांच्या ट्रेनमध्ये....
होतात आजही भास....
उगाच लोकांना ते....
नाही देत ते त्रास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मृतांची ट्रेन......
ऐकलय तिच्याबद्दल.....
आग लागली ट्रेनला....
आणि घडली अद्दल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही...✍️✍️

          


03 August 2022

विषय- ओल्या सांजवेळी....चारोळी संग्रह

तु येण्याची अपेक्षा....
उगाचच  रे वाढुन जाते....
ओली सांज जेव्हा....
खिडकीत माझ्या न येऊन जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सरून गेली तरीही......
रोजच आठवुन जाते......
ती ओली सांजवेळ......
जीला मी विसरू पहाते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका ओल्या सांजवेळेची.....
प्रत्येक सांज वाट रे पाहीली....
ती न आल्याची सल....
आजही रे मनी राहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूला परतून आणणारी....
सांजवेळ  रोज  यावी....
पहाता तुला डोळे  भरून....
अलगद मिठीत तुझ्या  मी शीरावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी....
नभ ही नटलेले.....
तु येशिल परतुनी भेटीला.....
हे त्यालाही वाटलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी......
आठवांचे दिप जळलेले.....
ओसंडलेल्या आसवांना......
अर्थ प्रेमाचे नव्याने कळलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी.....
पक्षि परतले घरट्यात....
पाखरा तु कधी परतशिल....
घालमेल आईच्या मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी......
मनि उठले काहुर......
चिंब झाल्या आठवणि......
कोसळता पहिली सर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी.....
सोबतिला सावली देउन जा....
मी भैरवि गायली....
तु पारवा गाउन जा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी जपल्या....
कळ्या संवेदनांच्या स्पर्शातल्या.....
त्या कळ्यांची ताटवे फुलवुन जा....
समज भावना रे मनातल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी.....
पापणिला येई पुर.....
आठवणि ओल्या तुझ्या....
नेई दुर दुर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिजलेल्या डोळ्यांनी.....
कातरवेळ टळुन जाई.....
ओली सांजवेळ......
आठवण तुझी ठेउन जाई....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही...✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...