10 January 2022
ऋणानुबंध (अलक) 9/1/2022
विरोधाभास (अलक) 9/1/2022
वळणावरची भीती। लघुकथा
काँलेज सुटल्यावर आजही ती धास्तावतच घराकडे वळली. सगळ्या मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या.पण,हिच घर पुढच्या वळवावर म्हणून एकटीच धापा टाकत चालत होती. तीला येतांना पहाताच वळणावर बसलेल्या टवाळक्यांनी रोजच्याप्रमाणे तीला छळायला सुरूवात केली. स्त्री जातीला लाजवतील., अपमानीत करतील असे शब्द आणि शीळ वाजवायला सुरुवात. ही घामाघूम होत, झपाझप पावलं टाकत घराकडे वळली होती. हे असं त्रास देणं काँलेजला गेल्यापासून रोजची होतं. हे ही चढ उतार ठरलेलेच का????
घरी सांगायला गेली तर शिक्षणावर बंदी येईल. आणि कुणाची मदत घेतली तरी प्रश्नार्थक नजरा ह्या तिच्यावरच. ह्या ठरलेल्या ना!! ह्याचढ उतारावर कसं लढाव त्या निरागस कळीने??!!!
आजही काँलेजहून परततांना त्या भिती वाटणाऱ्या वळणावर .तीला पाहुन टवाळक्यांनी जळायला सुरुवात केली. पण आज ती झपाझप पावले न टाळता हळूहळू चालत होती. जणू प्रवृत्तच करत होती चुका करण्यासाठी. काहीतरी शिजत होत तीच्या मनात. तीच्या या नीरधास्त वागण्यातून जाणवत होतच.
दोन दिवसांच्या सुटीनंतर आज पून्हा काँलेजवरून येत होती. मात्र त्या वळणावर शांतता होती. टवाळकी सारीच गायब होती. ही मात्र आत्मविश्वासाने,आनंदाने फुलपाखरासारखी बिघडतं घराकडे निघाली होती.
हो!! तीने आपल्या मैत्रिणींना विश्वासात घडणारा प्रकार सांगितला. त्यांनी सगळींनी मिळुन तीला छळतांनाचा व्हीडीओ बनवून गावभर फाँरवर्ड केला. अशी त्यांना चांगलीच अद्दल घडवली. समयसूचकता वापरुन आपल्या शेजारच्या भिंतीवर अशी मात केली.
पहीलाच प्रयत्न आहे. मार्गदर्शनाची आणि सांभाळून घ्याल ही अपेक्षा... 🙏🙏🙏🙏🙏
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
09 January 2022
चारोळी आणी हायकु 8/1/2022
का म्हणून छळावं स्वतःला .....
क्षुल्लक कारणांसाठी .....
ज्यांना कदर नाही आपली......
का फिरावं अशांच्या पाठी.....
क्षुल्लक कारणं असतात माझी.....
का म त्यात तू गुंतून जातो....
मी उगाच असं छळते स्वतःला ....
त्रास तुला का म होऊन जातो ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छळले होते
क्षुल्लक ते बोलणे
पोल खोलणे
छळले होते
दोष दाखवलेले
रागवलेले
छळले होते
अपेक्षांचे वादळ
सांग सरळ
छळले होते
जाणुन ते टाळणं
अश्रृ गाळणं
छळले होते
स्वार्थी ते वागणे
मन लागणे
छळले होते
आवरले नाही मना
चूकच होना
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावनाही कधी कधी.....
का अशा छळत असतात......
अबोला धरून क्षुल्लक कारणांवरून....
डोळ्यातुन गं म गळत असतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भास आणि स्वप्नांमध्ये .....
का रे ते छळणं असं......
मनामध्ये तू लपलाय
हेच जणू सांगणं जसं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षुल्लक कारणं होतं......
नजर नजरेला भिडली होती......
अव्यक्त प्रेमाने असं छळलं.......
दोघेही विरहात रडली होती ......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
का रे मना सांग ना तु......
का उगाचच छळत असतो....
गुण दोषांचे क्षुल्लक कारण देऊन ...
भाव मनातील टाळत असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
माणुसकी... 8/1/2022
भौतिक सुख हीच प्रगती ......
हे खुळ होत जेव्हा रूळल.....
माणूस माणूस राहीला नाही .....
पहाता मन होतं हळहळलं.....
स्वतःला काय वाटतं ......
ते कसे तो सांगेल.....
वेळ इतका कुठे त्याकडे......
आत आपल्या तो झाकेल.....
माणूसकी कशी जपावी......
प्रश्न मनाला पडला होता ......
पायाखाली फुल तुडवता......
पायी सुगंध देत फुल हसला होता .....
माणूसकी जपण्याच गोड गुपीत ....
क्षणात असं ते कळलेल......
आनंदी होण्यासाठी पुसावं......
वेदनेने डोळे गळलेलं......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह
आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...
-
🌹जगायचं राहून गेलं 🌹 जगायच राहून गेलं बालपण म्हणता म्हणता नकळत सरून गेल कळले मोल त्याचे तेव्हा तारुण्य स्पर्शून गेल खरच की बालप...
-
मेंदीही बघना जणु...... गोड ती लाजली....... तुझ नाव लीहीता....... लाल रंगात भीजली....... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 घेतोस का रे तुही परीक्...
-
माझ्या कांकणांची किणकिण .... आठवण तूझी देते.... तु शोधतो शब्द .... मी साद ती अशी देते ...