26 June 2022

चारोळी संग्रह....

समाजसेवेच्या कांडीने....
शिक्षणाची जादू केली ....
सावित्री बाई खरच ना.....
पर्रांची महाराणी होऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इतीहासातील एक....
परी गं आज आठवून गेली....
झाशीची राणी ती....
देशासाठी प्राण होती जी देऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परदेशातून आली होती....
मानवता ती शिकवून गेली....
मदर टेरेसा नावाची परी...
आज पुन्हा गं आठवून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सिंधूताई आपली होती ना.....
अनाथांची परी....
अनाथांनाच कळते गं....
महती तीची खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुखी संसाराच त्याच स्वप्न.....
आहे ग अजून अपुर्ण.....
गोड त्याला परी हवी....
असेल त्याच विश्व ती संपुर्ण..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांच्या सुखासाठी.....
नेहमी झटत राहीली.....
एक अशी परी मी.....
आईच्या रूपात ही पाहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्न आहे की आहे परी.....
की वेडू तू  गं कल्पना.....
खर सांगू तूच ग वेडी.....
माझ्या जीवनाची संकल्पना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाऊसात भीजता.....
वाटली जणू जलपरी.....
खुप झाले भास वेडू.....
येऊन भेट कधीगं खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक असते म्हणे.....
जणू एक परी.....
का आहे समाजात......
परकेपणाची  मग ही दरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परीकथांच ते जग.....
छान होत रमायला.....
बालपण नको होत.....
कधी रे ते सरायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटावी एक परी.....
जादू अशी करणारी.....
दुःख सगळ्यांची दूर सारून....
सुखाने जीवन भरणारी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक आपल्या आई बाबांची....
असतेच ना परी.....
तरीही होते परकी.....
कळेना कहाणी खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटत यावी....
एक छान गं परी....
माझी सावली....
असावी ती खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️   


परी....चारोळी संग्रह

प्रत्येक कवयत्री आहे ना  परी.....   
शब्दांनी जादू तीच्या  घडते.....
शब्दपंख लावून कशी ती वेडी....
कल्पनेच्या नभात ना उडते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू देशील का ग हक्क.....
अश्रृ तुझे पुसण्याचे.....
तू हसता दिसते ग परी....
देना हक्क हसू ते जपण्याचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हवी गं म्हणे परी.....
तूझ्यासारखीच एक गोड.....
पण नको बर  तीला....
तूझी बडबड करण्याची  खोड....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

असतेना लेक जरी.....
आई बाबांची परी.....
पण आई बाबाच असतात....
तीची जादूची कांडी खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपूर्ण ते स्वप्न......
पण रोजच तो बघत असतो.....
गोड परीसोबत त्याच्या.....
स्वप्नात तो खेळत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुपदा ती वेडी.....
त्याची स्वप्नपरीच ठरते....
कधी अव्यक्त तर कधी....
दुनियादारीत  ती हरते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सखी तुही जणु ......
आहे एक परी बर.....
सगळ्यांच्या अस्तित्वाला....
दिली गं ओळख नवी तुच खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेखणीही आहे गं....
जणू एक परी....
अव्यक्त रहात नाही....
वेदना ती  अंतरी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ताई माझी सखी....
परी माझी खास....
देते मला ती....
नेहमी आईचा गं आभास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


25 June 2022

चारोळी.संग्रह...

प्रेमाची रीत गं तो.....
जाता जाता ही निभवून गेला.....
फुलासोबत काटाही ....
असा तो ठेऊन गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्या फुलांच्या भाळी नसते....
जपणार्या काट्यांची साथ बर....
निसर्गाने  किती सहज....
मांडल जीवनाच गुपीत  खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येतात बर कधी कधी.....
काटेच जीवनात.....
पूढच वळण असत फुलांच....
नेहमी ठेवाव ध्यानात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगंधीत  फुल नी.....
बोचणारे  ते काटे....
सुख दूःखाच्या क्षणांना....
जणू फुटलेले फाटे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राणातला निवडूंगही.....
खुप ग शिकवतो......
काटेरी खडतर जीवनात ही......
मोहक आशेचा फुलोरा फुलवतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुले यावीत  पायदळी तूझ्या.....
काटे मी जपत जाईन......
सावली होऊन तुझी वेड्या.....
नेहमी  मी संगती राहीन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुल आणी काटे.....
जणू सुख दूःखाची जोडी....
अपरीहार्य सोबत रहाण.....
यातच जीवनाची गोडी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काट्यावर हसणार.....
फुल ते पाहील होत.....
दुःखातही हसत रहा.....
जणू सांगून ते राहील होत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुल आणी काटे.....
असावे संगत.....
जपणार्यांची सोबत....
आणते जीवनात रंगत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही....✍️✍️


फुल आणि काटे....चारोळी संग्रह

काटे आपला गुणधर्म.....
लपवतात का कधी बर.....
फुलांसारख आपल्याला.....
भुलवतात का सांगना खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वासाची परीक्षा.....
अशी ही  तो गं घेत गेला....
फुले आहे म्हणत .....
वाट काट्यांचीच  देत गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उगाच भेटतो का गुलाबाला....
राजा होण्याचा मान.....
काट्यावर हसतो बघ....
किती तो रे छान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु वेडी गुलाब....
मी बाबुईचा काटा....
कशा जुळतील सांग....
आपल्या बर वाटा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः काट्यात राहून....
सांगावा प्रेमाचा द्यावा.....
खरा त्याग तर....
गुलाबा कडून शिकावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काट्याला विचार.....
आहे बर खर.....
फुलही कधी कधी.....
रडवतात बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनही आहे न जणू....
गुलाबाची रे बाग.....
कधी सुगंध कधी काटे......
ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा रे भाग...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुलच ते कुस्करणार्याच्या......
हातालाही सुगंध ठेउन  ना जातात.....
काटे देणार्यांना माफ करावे.....
सांगावा सहज देऊन ना जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू दिलेला गुलाब....
आजही वहीत लपलेला.....
आपल्या प्रत्येक पाकळीत....
असंख्य आठवणी जपलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अविस्मरणीय  सुगंध...
आहे तो गुलाबाचा....
काट्यावर राहुन ही .....
आवडतो छंद त्याचा दरवळण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदर नाही त्यांना....
फुल गं दिली होती....
अनुभवांच्या काट्यांनी....
रात्र ग ओली होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

दोन क्षण...

ऐकना...!!!
नाही केली रे अपेक्षा.....
फुल तू द्यावे अशी ती कधी.....
फुल आणी काटे असतील.....
जीवनाचा भाग म्हणता अधी मधी.....
पण,एक सांगू....
येतजाना घरी कधी कधी लवकर.....
वाट बघता तुझी दमते रे घरभर.....
नको आणूस फुल भेट म्हणता द्यायला....
पण,ओढ आणी आनंद ओसंडूने....
भेटण्यासाठी फुल असेल माझ तेच....
नको हे कधी तु  विसरायला.....
आहेत काही काटे मनात बोचलेले....
सांगायच पण ओठातच रोखलेले....
तूझी दगदग पहाता नाही वाटत सांगावेसे....
पण,वाटत म्हणाव कधी तु.....
मी आहे ना सोबत का गं काळजी करते....
जादू तूझ्या शब्दांची आजही मनावर चालते....
हे काटे ही होतील बोथट शरीराने नाही....
मनानेही असशील का कधी तु संगत....
घेशील कधीओंजळीत भरलेली प्रीतीची फूले....
देशील तूझ्या मनीचे ते काटे न कळलेले....
काही नाही म्हणता सहज तू दडलेले.....
देवाण घेवाण फुल आणी काट्यांची.....
करत जाऊ ना कधी कधी....
किती धावपळ ही जगण्याची....
दोन क्षण थांबत जाऊना रे.....
कधी एकमेकांमधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही...✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...