29 June 2022

छंद जगण्याचा....चारोळी

छंदच असतो जो....
स्वतःशी भेट घडवून जातो....
स्वःताला सिध्द करण्याची संधीही....
खूपदाना  देऊन जातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आरश्यात रमण्याचा छंद तुझा....
वेडु आवडत नाही बर.....
तो आवडतो की मी सांग तरी....
एकदा मला खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद  हा जगण्याचा.....
अडचणीत  मार्ग  शोधून रे देतो.....
सुखाचा क्षण उभा  वळणावर......
आशेचा किरण  साद ही देतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद जगण्याचा खरा.....
मुर्तिकार तो सांगून गेला......
घाव सोसल्या शिवाय का.....
दगडाला ही देवत्व आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या आठवणींच्या पसार्यात....
जाणवतो तूझाच रे गंध....
का सोडून गेलास वेड्या....
लावून आसवांचा रे छंद....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुठल्याच छंदात वेड मन....
रमत नाही रे आता....
तुझ्याशिवाय कुठलाच छंद जोपासायला....
जमत नाही रे आता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद लागलाय वेड्या मनाला....
शब्दात तूलाच मांडण्याचा.....
तूझ्या शब्दफुलात उगाच भास...
स्वतःचा तो शोधण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इंद्रधनुच्या क्षणभंगुर जगण्यातून.....
छंद जगण्याचा समजून घ्यावा.....
किती जगलो यापेक्षा कसे जगलो....
सार जगण्याचा यातून हा यावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेहंदीची ती पान.....
मोहातच रे पाडून गेली.....
आयुष्यात दुसर्याच्या रंग भरण्याचा....
खरा छंद हा जगण्याचा सांगून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद विणकामाचाही....
जगण्याला छंद बनवून गेला....
नाते घट्ट बांधण्याच तंत्र....
गुपीत या कलेच होऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही....✍️✍️


28 June 2022

तडजोड....चारोळी

जबाबदारिची जाणिवच.....
आहे ती बर.....
स्वप्नांशी तडजोड करायला.....
शिकवते जी खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक तडजोड वेडू....
चलना आपण अशी करू....
एकमेकांना बदलायचा....
प्रयत्न नाही हं कधी करू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी असता ही तडजोड राजा....
करावी लागली जर  तुला....
प्रेमात मी हरल्याची ती.....
सल असेल आजन्म मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तडजोड म्हणजे......
शरणागती नाही बर.....
परिस्थितीवर केलेली......
असते ती मात खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोड......
हे कुलदिपकालाही  लागू पडत बर.....
कर्तव्यात स्वप्न त्याचीही भंगतात.....
पण वाच्यता कमी होते कटुसत्य हे खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद आवड निवड.....
जरी वेगळी असली.....
मन जुळली नारे आता.....
मग तडजोड ती कसली?!....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तत्वांशी तडजोड.....
नको करु बर....
आयुष्य म्हणजे तडजोड....
असुदे कितीही खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोड.....
या शिवाय नात टिकत रे नसत.....
नात्याचा खरा सन्मान.....
समजून नी सांभाळून घेण्यात रे असत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोड जणू.....
दुनियादारीतला वकील  छान .....
कुठलाही वाद संपवतो....
ठेऊन त्या वेळेच भान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️


27 June 2022

चारोळी संग्रह....

नको होऊ उन्मन्त बर.....
गगन भरारी घेता.....
यश हा पाठशिवणीचा खेळ....
जप बर मनाची स्थिरता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांचे पंख लावून....
प्रयत्नाना दे भरारी....
यश तुझेच असेल.....
फीरु नको रे माघारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांग ना सख्या होशील का....
बळ रे या पंखांच.....
घ्यायचीय रे भरारी.....
स्वप्न आभाळी रे ऊडण्याच.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे भरारी  पण.....
लक्षात हे ही रेअसू द्यावे....
ध्येय नी स्वप्नांच्या पाठी....
नाते कुठलेच रुसू न द्यावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे भरारी कीतीही.......
पण स्त्य हे जीवनाचे......
आभाळात नाही ठीकाण.....
कुठेच बर रहाण्याचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे उंच भरारी
जसा उडे आकाशी शिकरा
दाखवून दे आता
तूझ्या अस्तित्वाचा अर्थ खरा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चाखायची असेल यशाची गोडी....
एक तु करशील का......
तोडून  स्त्रीत्वाची बेडी.....
उंच भरारी तु भरशील का.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे भरारी.....
वैचारीक बर.....
प्रगतीच कारण....
हेच खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कल्पनेच्या जगात.....
घेते ग भरारी......
आवडत मला.....
रमायला तीथे भारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  घे बर भरारी......
हव त्य क्षेत्रात.......
ऐकल हे खुपदा.......
गप्पांच्या ओघात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


घे भरारी....चारोळी संग्रह

पक्षी कसा उडतो.....
पंखांच्या जोरावर.....
नाही जमवत अन्नधान्य .....
भरवसा पंखांच्या बळावर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बंधनांचे पींजरेही......
ध्येय तु म्हणता तोडले असते....
भरारी ही तुझ्यासाठी......
कधी तरी तुला कळले असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उंच भरारी घेण्यास.....
आशिर्वादांचे पाठबळ मीळावे बर....
आपल्यांच्या सोबतीने.....
यशाचे शिखर सहज होतात खर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बांध गाठ ग.....
जीद्द नी प्रयत्नांची.....
अंधार पीऊन उजळेल....
कहाणी संघर्षाची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नित्य ठेव मनी....
ध्यास प्रगतीचा....
प्रयत्नांनी मीळतो....
मार्ग उन्नतीचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे ग भरारी आता....
वादळाला नाही  घाबरायच....
पंखात आहे  ग बळ....
आता करून काही  दाखवायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खूप झालं ग वाटं पहाणं....
येईल कुणी लढेल आपल्यासाठी....
तूच तुझे बळ बनकी.....
घे भरारी ऊडण्यासाठी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उंच भरारी
बाणा ठेव करारी
हिच उभारी

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कृती  चे बळ घेऊन......
मी का भरारी मारू नये......
अडगळ सारून परंपरेत रमणे.....
प्रगती याला का जाणू नये....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या आपल्यांनीच  दिला....
भरारी घेण्याचा ध्यास....
धीक्कारून रूढी तीनेही.....
घेतला मग निर्भीड श्वास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


26 June 2022

चारोळी संग्रह....

समाजसेवेच्या कांडीने....
शिक्षणाची जादू केली ....
सावित्री बाई खरच ना.....
पर्रांची महाराणी होऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इतीहासातील एक....
परी गं आज आठवून गेली....
झाशीची राणी ती....
देशासाठी प्राण होती जी देऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परदेशातून आली होती....
मानवता ती शिकवून गेली....
मदर टेरेसा नावाची परी...
आज पुन्हा गं आठवून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सिंधूताई आपली होती ना.....
अनाथांची परी....
अनाथांनाच कळते गं....
महती तीची खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुखी संसाराच त्याच स्वप्न.....
आहे ग अजून अपुर्ण.....
गोड त्याला परी हवी....
असेल त्याच विश्व ती संपुर्ण..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांच्या सुखासाठी.....
नेहमी झटत राहीली.....
एक अशी परी मी.....
आईच्या रूपात ही पाहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्न आहे की आहे परी.....
की वेडू तू  गं कल्पना.....
खर सांगू तूच ग वेडी.....
माझ्या जीवनाची संकल्पना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाऊसात भीजता.....
वाटली जणू जलपरी.....
खुप झाले भास वेडू.....
येऊन भेट कधीगं खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक असते म्हणे.....
जणू एक परी.....
का आहे समाजात......
परकेपणाची  मग ही दरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परीकथांच ते जग.....
छान होत रमायला.....
बालपण नको होत.....
कधी रे ते सरायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटावी एक परी.....
जादू अशी करणारी.....
दुःख सगळ्यांची दूर सारून....
सुखाने जीवन भरणारी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक आपल्या आई बाबांची....
असतेच ना परी.....
तरीही होते परकी.....
कळेना कहाणी खरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटत यावी....
एक छान गं परी....
माझी सावली....
असावी ती खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️   


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...