20 May 2022

अपेक्षा....

      अपेक्षा...!अपेक्षा...!!अषेक्षा....!!!
अपेक्षा म्हणजे काय,तर माझ्या मनाला हवी तशीच कृती इतरांनी करावी हेच ना!!किती सहज अपेक्षा करतांना आपण स्वतःला महत्व दिलेल.अपेक्षा ही इतरांकडून असते तशी स्वतः कडूनही असतेच. आणी ती सकारात्मक असतेच असे नाही ती नकारात्मकही असू शकते.
      तारुण्याच्या उंबरठ्यावर तरूणीच्या अपेक्षा आपल्या स़्वप्नातल्या राजकुमारा कडून.शीक्षण संपता तरूणाच्या आपल्या नोकरी आणी व्यवसायातल्या अपेक्षा.मुलांगी मार्गी लागाव आई बाबांच्या अपेक्षा.मुलीला कलागुणांसहीत जपून नेणार्या सासर ची अपेक्षा,सुनेने घरात मीसळून जाण्याची जणू दूधात साखर होण्याची अपेक्षा.
       जीतकी नात्यांची रूपे तीतक्याच अपेक्षा आणी तीतकच अपेक्षाभंगाच दुःखही.
        अपेक्षा करणे चुकीच नाहीच,पण ती पुर्ण नाही झाली तर वास्तव स्विकारण्याची प्रगल्भता असणे यातच माणसाची खरी परीपक्कता दिसते.अपेक्षांची घागर बुडल्यामुळे जगण्याला अर्थच नाही म्हणून निराष होणार्यांनी अपेक्षांना नवा अर्थ नक्कीच शोधावा.
       पानगळतीनंतर जस झाड टवटवीत होत ,तस आयूष्यही जगता येईल हेच  निसर्गाचही सांगण असाव. आयुष्य खूप सुंदर आहे.गरज आहे ती सुंदर दृष्टीकोनातून पहाण्याची.अपेक्षांचा चश्मा बाजूला सारुन तर पहावूया....नक्कीच दिसेल एक स्वच्छ आणी निर्मळ आयष्य....स्वच्छंदी आणी अपेक्षांच्या ओझ्यानी न दबलेल......!!!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                   शाही..✍️✍️...

18 May 2022

झलक.....चारोळी संग्रह

आचरणात तुझ्या दिसते ग झलक.....
संस्कार आणी शिक्षणाची.....
श्रिमंती नाही ग खरी ती......
कागदी  डिग्रींची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपुलकीची झलक दिसता....
रमते बर ती वेडी...
परके पणाची भीती....
जाते कुठे तीची थोडी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झोपेतून उठता  असतो ग हट्ट त्या वेड्याचा.....
झलक माझी पहाण्याचा.....
मला ही आवडतो बहाणा.....
माझ्यात असा त्याचा ग तो रहाण्याचा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदर नाही केली तर.....
जाईन अशी रूसून.....
झलन ही दिसणार नाही....
डोळे जातील तुझे तरसून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक झलक पुरी नसते.....
माणुस तो ओळखण्यासाठी...
किती वर्षांची साथ ही कमी पडते...
कधी कधी समजून ते घेण्यासाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कठीण असत ज्यांची....
झलक ही पहाण....
त्यांनाच  जमत जीवनात....
खास होऊन राहण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वार्थामागे कशी ना....
माणूसकी ती दडली....
फायद्या तोट्यावर आता....
झलक तीची ठरली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु नाही दिसलास की राजा....
मन वेड रे तडफडत....
तुझी झलक पहाता....
बघ ना कस हे धडधडत......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती निरागस पणे विचारल त्याने....
आवडत काय ग तुला....
मी ही हळूच म्हणून गेली....
तुझी एक झलक हवी रे रोज मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपण ही झलक दाखवून....
क्षणात  तीच ते निघून जात....
ताई म्हणता ती माय होते....
जगण अस सहज  तीलाच जमून जात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️..


17 May 2022

चारोळी संग्रह.....चारोळी

आई बाबांना भारतीय संस्कृतीत....
देवत्व आहे ना दिल.....
वृध्दाश्रम उघडून आपण.....
का पाश्चीमांत्यांच अनुकरण केल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लीहीणार्याच्या लेखनात....
संस्कृती ती जतन होते....
आणी ज्ञानसंवर्धन ते....
वाचकांसाठी ठरते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

महान आपली भारतीय संस्कृती....
स्त्रीला देवत्व देऊन गेली.....
आपण कमी पडलो जपायला हिला....
निर्भया ही जाणीव ठेऊन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपासना,त्याग, संयम .....
सहीष्णुता यांच मीश्रण बर....
भारतीय संस्कृतीतच आहे.....
अंधारा कडून प्रकाशाकडे नेण्याच बळ खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कृतीत दडलेली.....
व्यवहारी ओळख बर....
सार्वभौमिक मानवि आणी...
अध्यात्मीक मुल्यांची खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कृती म्हणजे.....
सर्वसमावेशक कृती......
पुरातन परंपरा जपणारी......
आहे ती भारतीय संस्कृती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इतीहास,विलक्षण भुगोल आणी.....
वैविध्यपुर्ण जनजीवन बर.....
यामुळे  आकाराला आली.....
भारतीय संस्कृती खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रंग भाषा भेद......
आहेत वेगवेगळी......
तरीही एकत्र नांदतात.....
भारतीय संस्कृतीत सगळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रंग भाषा भेद......
आहेत वेगवेगळी......
तरीही एकत्र नांदतात.....
भारतीय संस्कृतीत सगळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विवीधतेतून एकात्मता....
देशात माझ्या दिसते....
यातच माझी भारतीय संस्कृती....
किती छान हसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्या संस्कृतीने.....
विश्वालाच कुटूंब म्हटल.....
भारतीय संस्कृतीचा गर्व.....
मज आहे म्हणून म्हटल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भारतीय संस्कृती....
जगात महान.....
शब्द कमी पडतील....
किती गाऊ मी गान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️..


भारतीय संस्कृती...चारोळी संग्रह

मुक्या प्राण्यांवर दया.....
आणी गरजूंना मदत....
माणूसकी आणी प्रेमाने...
भारतीय संस्कृती  असते सजत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्दैतभाव हा......
महत्वाचा घटक भारतीय संस्कृतीचा.....
समाजात वावरतांना.....
भान आपण हा जपायचा....

अव्दैत-- आपल्या सारखेच इतर आहेत ही संकल्पना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निरोगी राहण्याचा संदेश.....
भारतीय संस्कृती ठेऊन गेली.....
योगविद्या आणी आयुर्वेदातून.....
महत्व याचे जतवून गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाहीलं का कधी  तू बीज अंकुरतांना....
हात जोडून  जमीनीवर  रोप येतांना....
आभाराची परंपरा संस्कृती  आपली....
निसर्गाने ही गोड  ती जपली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहेच मी खरंच  भाग्यवंत....
भारतभूमीवर जन्म तो झाला.....
खंत  एकच बंधूप्रेमाच्या संस्कृतीत....
का राजकारण जाती पातीचा  आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खाद्यसंस्कृती अशी......
भलीमोठी लाभलेली......
प्रत्येक राज्याने आपली.......
पारंपारीक पदार्थांची चव जपलेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नृत्य संगीत उत्सव....
राज्या राज्यांचे वेग वेगळे....
विविधतेने नटलेले.....
संस्कृतीचे रूप सगळे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था....
भारतीय संस्कृतीची जान.....
लेकरांना मीळावे संस्कार....
अन संगोपन हा त्यात  लपला मान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही...✍️✍️..

.

     

खुप गरज बर.....
संस्कृती ती जपण्याची....
नाहीतर कठीण बर....
प्रगती ती देशाची.....

गुरू शीष्य परंपरेला....
भारतीय संस्कृतीत मोठ स्थान.....
दोघांनी जपावी नात्याची गरीमा....
करावा आपल्या संस्कृतीचा सम्मान....


16 May 2022

चारोळी संग्रह....

दोष कुणाचा यावर....
नको वाद वाढायला.....
खुप सोप कारण हे बर....
खरा मुद्दा टाळायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माफ करून द्याव....
सगळ्यांना आपल म्हणता...
का बसाव बर....
दोष कुणाचा गणता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कायदयांना पळवाटा....
आपण त्या शोधायच्या  बर....
सुव्यवस्था नांदत नाही म्हणता....
दोष कुणा द्यायचा खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुरुष म्हणता संस्कार करता....
वेगळी त्याला ग जाणीव....
अवहेलना होता स्त्री ची....
दोष कुणाचा शोधावी का  ग उणीव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनुष्य रे मीश्रण.....
गुण आणी दोषाचा.....
कसा करावा रोष.....
सांग मग कुणाचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चालतांना लागली ठेच....
दोष हा कुणाचा....
दगडाचा की पायाचा की....
तूझ्यात गुंतलेल्या मनाचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दरवाजा घट्ट झाला म्हणता....
पावसाचा का ग दोष.....
भीजलेल्या आठवणी मनाच्या उंबरात....
अडकल्या हा त्याचा ना रोष...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष कुणाचा.....
कस बर सांगाव.....
कुंपणच शेत खातय.....
सहज कुणी मानाव...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नात्यांची सुंदरता.....
दोष एकमेकांचे रे स्विकारण्यात.....
दोष कुणाचा म्हणत....
नाते नाही नाकारण्यात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष कुणाचा.....
मानव प्रवृत्तीचाच असावा....
आवडता सगळ गोड ते दिसाव....
न आवडता होताच दोष आणी दोषच असाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्न माझी तर...
प्रयत्न ही माझे असावे....
का बर दोष.....
कुणा दुसर्याला द्यावे....

🌞


नाही रे वेड्या मना....
दोष तूझा नाही....
नशिबात जे नसत...
तेच फार मला आवडून जायी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप सोप ना....
दोष कुणाचा?शोधण....
किती बोट आपल्याकडे वळली...
सहज नाही ना मोजण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी  दोष ती.....
नशीबावर लोटते....
आपल्या भावनांचा....
असाही गळा घोटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुक कुणाचीही असूदे.....
परीस्थीतीला दोष देऊ....
राजा आपल नात आपण....
अस नेहमी जपून घेऊ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..✍️✍️..


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...